कानपूर : ऐतिहासिक आणि धार्मिक शहर बिठूर (Bithur city)आता केवळ पर्यटन नकाशावरच दिसून येणार नाही तर गंगेच्या काठावर वसलेले हे ठिकाण पर्यटकांनाही आपल्याकडे आकर्षित करेल. अर्थ गंगा प्रकल्पांतर्गत आता बिठूर शहराची पर्यटनाच्या दृष्टीकोनातून सुधारणा केली जाईल. प्राथमिक अंदाज असा आहे की यासाठी सुमारे १०० कोटी रूपये खर्च केले जातील. योजनेंतर्गत बिठूर शहरापासून गंगा बॅरेजपर्यंत पर्यटक नौकाविहार करण्यासह क्रुझ बोटचा(cruise boat) देखील आनंद घेऊ शकतील. येथे वॉटर स्पोर्ट्सचे(Water Sports) देखील आयोजन केले जाईल.
यूपी : बिठूर शहराची पर्यटनाच्या दृष्टीकोनातून होणार सुधारणा!
UP: Bithur city to improve from tourism point of view!
नमामि गंगे प्रकल्पाद्वारे येथील घाट सुशोभित करण्यात आले असले तरी पर्यटनाच्या अनुषंगाने अनेक कामे अद्याप बाकी आहेत, जी कामे आता अर्थ गंगा प्रकल्पांतर्गत पूर्ण होतील. या योजनेंतर्गत उत्तराखंडातील ऋषिकेश, कानपूरमधील बिठूर आणि बिहारमधील भागलपूर येथील एका घाटाची निवड करण्यात आली आहे. तसेच शिल्प संस्कृतीबरोबरच येथील खाद्यपदार्थांना प्रोत्साहन देण्याचे कामही दूरदूरपर्यंत केले जाईल.
पावसाळ्यात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी ‘फागू’ हे ठिकाण सर्वोत्तम! –
ईको टूरिझमला (eco-tourism)चालना देण्यावर विशेष भर दिला जाईल. येथे लोक धार्मिक पर्यटनासाठी येत असतील तर त्यांना बिठूरच्या धार्मिक आणि स्वतंत्र्य चळवळीबद्दल देखील जाणून घेता येईल. धार्मिक पर्यटन वाढल्यास येथील स्थानिक लोकांचे आणि विविध सुविधा देणाऱ्यांचे उत्पन्नही वाढेल. ध्रुव टिळा ते पत्थर घाटापर्यंत सायकल ट्रॅक तयार केला जाईल जेणेकरुन पर्यटक सायकलवरून प्रवास करु शकतील. तसेच येथे येणाऱ्या पर्यटकांना फिल्म पाहता यावी यासाठी एमपी थिएटरची सुविधा देखील देण्यात येणार आहे.
नैनीतालमध्ये दीड महिन्यानंतर पुन्हा रज्जूमार्ग सुरू….. –
पर्यटन विभाग घाटांचे सौंदर्यीकरण करेल आणि तिथे बिठूरचा इतिहास लिहिला जाईल. पत्थर घाट, ब्रह्मावर्त घाट, ध्रुव टीळा यासह सर्व घाटांवर सौर दिवे बसविण्यात येतील. विविध प्रजातीची रोपे लावली जातील. गंगा नर्सरीची स्थापना केली जाईल, ज्यात औषधी वनस्पती असतील. वाराणसी, हरिद्वार आणि ऋषिकेश यांच्या धर्तीवर दररोज गंगा आरती केली जाईल. उन्हाळ्यात गंगा घाटांपासून दूर जाते, परंतु अशी व्यवस्था असेल की गंगा घाटांवर कायम राहील.
Bithoor will give impetus to eco-tourism in UP, know what will happen with the project of 100 crores.
पर्यटन क्षेत्राला दिलासा, पर्यटक मार्गदर्शकांना मिळणार १ लाखापर्यंत कर्ज…. –
आनंददायी हवामानाची मजा घेण्यासाठी शिमल्यात पर्यटकांची गर्दी…. –
शिमल्यात गेल्या आठवड्याच्या तुलनेत यावेळी हॉटेलांमधील व्यवसायात लक्षणीय वाढ…