कोविडविरूद्ध लसीचे दोन डोस प्रभावी तिसऱ्या डोसची आवश्यकता कदाचित भासणार नाही : ऑक्सफोर्ड अभ्यासाचा दावा

लंडन, Covid Vaccine : कोरोनाचे वेळोवेळी नवीन व्हेरिएंट समोर येत आहेत. अशा परिस्थितीत ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, एस्ट्राजेनेका लसीचा तिसरा डोस कोरोना व्हेरिएंटविरूद्ध संरक्षण देईल. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, एस्ट्राजेनेका लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर ६ महिन्यांनी बूस्टर डोस दिल्याने शरीरात प्रतिपिंडांची पातळी वाढते. भारतात एस्ट्राजेनेकाची ही लस कोविशील्ड नावाने लोकांना दिली जात आहे.

ऑक्सफोर्डच्या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, कोव्हिडविरूद्ध लसीचे दोन डोस चांगले कार्य करतील आणि तिसऱ्या डोसची आवश्यकता कदाचित भासणार नाही. अभ्यासानुसार, एस्ट्राजेनेका किंवा फायझरचे दोन डोस घेतल्याने डेल्टा व्हेरिएंटमुळे रूग्णालयात दाखल होण्याची शक्यता सुमारे ९६ टक्क्यांपर्यंत कमी होते.

भारताने कोरोना लसीकरणाच्या बाबतीत अमेरिकेला टाकले मागे….. 

दुसऱ्या नव्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, एस्ट्राजेनेका लसीचा एक डोस शरीरात कमीत-कमी एका वर्षापर्यंत प्रतिपिंडाची उच्च पातळी राखण्यास मदत करतो. तर दोन डोसनंतर हे संरक्षण वाढते. या नवीन अभ्यासाचे परिणाम एका प्रयोगशाळेच्या चाचणीद्वारे आले आहेत, ज्यामध्ये ब्रिटनमधील ९० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. या सर्व सहभागींचे वय सुमारे ४० वर्षे होते. या सर्व सहभागींनी ऑक्सफोर्ड वॅक्सीनचा तिसरा डोस घेतला होता. त्यांच्यातील प्रतिपिंडाची पातळी तपासण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना देखील घेण्यात आला.
संशोधकांना असे दिसून आले की, दुसऱ्या डोसच्या तुलनेत तिसऱ्या डोसनंतर न्यूट्रलायझिंग एँटीबॉडीमध्ये लक्षणीय वाढ झाली.

Blood Sugar नियंत्रित करण्यासाठी करा ‘या’ पदार्थांचे सेवन….

ऑक्सफोर्डच्या असोसिएट प्राध्यापक टेरेस लॅम्बे यांनी सांगितले की, हे खूप उत्साहवर्धक आहे. तथापि प्राध्यापक सर एंड्र्यू पोलार्ड यांचे म्हणणे आहे की, अद्याप हे स्पष्ट झालेले नाही की वास्तविक जगात एँटीबॉडीची पातळी कशाप्रकारे सुरक्षा देईल. संशोधकांना स्वयंसेवकांच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये टी-पेशींचा उच्च स्तर देखील दिसून आला. टी-पेशी संक्रमणापासून बचाव करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात. प्राध्यापक पोलार्ड यांनी सांगितले की, जर दक्षिण आफ्रिकेतील बीटा व्हेरिएंट ब्रिटनमध्ये आढळला असेल आणि त्याचा प्रसार झाला असेल तर बूस्टर शॉट चा वापर केला जाऊ शकतो.
Covid Vaccine: Will a third dose of vaccine be needed, claims Oxford study.



गर्भवती महिलांच्या लसीकरणाविषयी आरोग्य मंत्रालयाने जारी केली मार्गदर्शक तत्वे… –

गर्भवती महिला देखील कोव्हिड-१९ लस घेऊ शकतात, आरोग्य मंत्रालयाने जारी केली मार्गदर्शक तत्वे

कोरोनाचा मुलांच्या तुलनेत मुलींवर अधिक प्रभाव : अभ्यास –

कोरोनाचा किशोरवयींवर अधिक तणाव, मुलांच्या तुलनेत मुलींवर अधिक प्रभाव : अभ्यास

Social Media