नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम प्रवर्तन संचालनालयाने (ईडी)समन्स पाठविले आहे. तिची परकीय चलन व्यनस्थापन कायद्याचे (FEMA फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट) उल्लंघन केल्याप्रकरणी चौकशी केली जाईल. ईडीने यामी गौतमला हे दुसऱ्यांदा याच प्रकरणाबाबत समन्स पाठविला आहे. पहिला समन्स गेल्या वर्षी पाठविण्यात आला होता. त्यावेळी यामी लॉकडाऊनच्या निर्बंधामुळे ईडीच्या कार्यालयात पोहोचू शकली नाही. यावेळी यामीला ७ जुलैपर्यंत ईडी कार्यालयात हजेरी लावावी लागेल.
डिजिटल पदार्पणासाठी अजय देवगन तयार –
यामी गौतमवर ईडीचे लक्ष आहे. असे म्हटले जात आहे की, यामीच्या खात्यातून परकिय चलन व्यवहारात गडबडी झाल्याने चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक मोठ्या बँनरखालील चित्रपट मनी लॉन्ड्रिंगमुळे ईडीच्या निश्याण्यावर आहेत. मागील वर्षी सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित अनेक लोकांची ईडीने चौकशी केली आहे. यामी अलिकडेच ‘उरी’ चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य धर याच्यासोबत लग्न बंधनात अडकल्यानंतर चर्चेत आली होती. नुकतीच यामी गौतम आपल्या पतीसह मुंबईत परतली. त्यांच्या नव्या लूकचा फोटो देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता.
महाभारतावर आधारित चित्रपटात रिया चक्रवर्ती द्रौपदीच्या भूमिकेत? –
यामीच्या आगामी चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर, ती ३ चित्रपटांमध्ये भूत पोलीस, दसवी, ‘अ थर्सडे’ मध्ये दिसून येणार आहे. भूत पोलीस या चित्रपटात तिच्या व्यतिरिक्त अर्जुन कपूर, सैफ अली खान आणि जॅकलीन फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहेत. दसवी चित्रपटात अभिषेक बच्चन आणि निमरित कौर दिसून येणार आहेत. या चित्रपटात यामी आयपीएस ऑफिसरची भूमिका साकारताना दिसून येणार आहे. तर, अ थर्सडे या चित्रपटात यामी एका शिक्षिकेची भूमिका साकारणार असून हा एक थ्रिलर चित्रपट आहे.
ED sent notice to actress Yami Gautam, statement to be filed in money laundering case by July 7.
तमिळ सुपरहिट चित्रपट ‘रत्सासन’ च्या हिंदी रिमेकमध्ये अक्षय कुमारची वर्णी… –
तमिळ सुपरहिट चित्रपट ‘रत्सासन’ च्या हिंदी रिमेकमध्ये अक्षय कुमारची वर्णी…
‘दोस्ताना2’ चित्रपटात कार्तिक आर्यनच्या जागी दिसणार अक्षय कुमार –
कार्तिक आर्यनला बाहेर काढल्यानंतर ‘दोस्ताना-2’ चित्रपटामध्ये अक्षय कुमारची वर्णी!