हसीन दिलरूबा चित्रपटाला प्रेक्षक, समीक्षकांकडून मिळणाऱ्या संमिश्र प्रतिसादामुळे तापसी पन्नू भडकली….

नवी दिल्ली : अभिनेत्री तापसी पन्नूने गेल्या काही वर्षांत बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये स्वतःला सिद्ध केले आहे. सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा फिल्मफेअर अवॉर्ड जिंकणारी अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या ‘हसीन दिलरूबा’ चित्रपटामुळे आनंदी आहे तर एकीकडे चित्रपट समीक्षकांमुळे चारीबाजूने घेरली गेली आहे. एकिकडे कंगना रणावत आणि तिची बहिण रंगोली आहे तर, दुसरीकडे चित्रपट समीक्षक आहेत ज्यांनी हसीन चित्रपटापेक्षा हॉलिवूड चित्रपट ‘द टुमॉरो वॉर’ला प्राधान्य दिले आहे.

वास्तविक तापसी पन्नू भडकण्याचे कारण म्हणजे हसीन दिलरूबा चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान एक हॉलिवूड चित्रपट देखील प्रदर्शित झाला आहे ज्याचे नाव द टुमॉरो वॉर आहे. तापसीच्या चित्रपटाऐवजी काही समीक्षकांनी द टुमॉरो वॉर या चित्रपटाला चांगले असल्याचे म्हटले आहे त्यामुळे तापसीला याचा राग आला आहे. आता अभिनेत्रीने चित्रपट समीक्षकांची टीका करत हॉलिवूड चित्रपटावर देखील निशाणा साधला आहे.

चित्रपट ‘हसीन दिलरुबा’ प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटासंदर्भात मिळालेल्या प्रतिक्रियांवर तापसीने तिच्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, ‘तिच्या अभिनयाबद्दल काही लोक तिच्यावर वैयक्तिक टिप्पण्या करत आहेत, जे तिला अजिबात आवडलेले नाही. ’

याव्यतिरिक्त तापसीने अलिकडेच एका चित्रपट पत्रकाराच्या ट्विटवर तिची प्रतिक्रिया दिली आहे, ज्यात असे लिहिले होते की त्याच्या सहकारी चित्रपट समीक्षकांना हसीन दिलरूबा, जो एक ओरिजिनल कंटेन्ट आहे, त्यात काही विशेष दिसले नाही आणि त्यांनी या चित्रपटापेक्षा ‘द टुमॉरो वॉर’ला चांगले असल्याचे म्हटले आहे.

या चित्रपट पत्रकाराला प्रतिउत्तर देताना तापसी पन्नू ने लिहिले आहे की, ‘सर, हॉलिवूड आहे ना, सर्व चालते. दोषांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी हे कायम महत्वकांक्षी असते. आम्ही येथे कितीही प्रयोग केले तरी ते कायम लहानच वाटतात, त्यामुळे आम्ही त्यांना अनावश्यक वाटतो, मग आम्ही कितीही केले असले तरी, कदाचित एलए बाहेर काम केल्याने मदत मिळेल. ’
Taapsee Pannu furious at film critics, telling this Hollywood film better than ‘Haseen Dilruba’

Social Media