मुंबई, दि.29 : सुशांतसिंह राजपूतचे वडील के के सिंह यांनी अभिनेत्री आणि सुशांतची प्रेमिका रिया चक्रवर्ती विरोधात प्राथमिक तक्रार एफआयआर दाखल केली आहे आणि तिच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. सुशांतच्या वडिलांनी पाटणा येथील राजीव नगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे की, मुंबई पोलिसांच्या तपासावर त्यांना विश्वास नाही. सुशांतच्या वडिलांनी दिवंगत अभिनेत्याची प्रेयसी, जवळची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्यावर गंभीर आरोप केल्याने सुशांत प्रकरणाला व्अगळे वळण मिळाले आहे.
सुशांतला चित्रपट सोडून केरळमध्ये जाऊन तेथे सेंद्रिय शेती करायची होती. पण रियाने सुशांतला सतत थांबवले कारण ती त्याच्यासोबत शिफ्ट होऊ शकत नसल्याचे सुशांतच्या वडिलांनी केलेल्या आरोपांमध्ये म्हटले आहे. जेव्हा सुशांत यासाठी तयार झाला नाही त्यामुळे तिने सर्व दागिने, पैसे, क्रेडिट कार्ड, महत्त्वाची कागदपत्रे, लॅपटॉप आणि वैद्यकीय अहवाल घेऊन तिच्या घरी गेली. तिथे जाऊन तिने सुशांतचा नंबर देखील ब्लॉक केला असेही सुशांतच्या वडिलांनी सांगितले. सुशांतने त्याच्या बहिणीला फोन करून सांगितले होते की रिया सर्व कागदपत्रे घेऊन गेली आहे आणि सुशांत वेडा असल्याचे मीडीयाला सांगण्याची धमकी देत आहे. आणि कोणीही त्याच्याबरोबर काम करण्यास तयार होणार नाही. 2019 मध्ये रियाला भेटण्यापूर्वी सुशांत पूर्णपणे सामान्य होता. मग असे काय बदलले की रियाला भेटल्यानंतर काही महिन्यांतच तो मानसिक रुग्ण बनला? सुशांत मानसिक रुग्ण होण्याचे कारण काय होते? या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. सुशांतसिंह राजपूत याला मानसिक त्रास होत असेल तर त्यांच्या कुटुंबियांना का सांगितले गेले नाही? खरंतर याबाबत त्याच्या कुटूंबाला आधी माहिती मिळायला हवी होती. रिया सुशांतला तिच्या घरी घेऊन गेली आणि उपचारा दरम्यान त्याला बर्याचदा ओव्हरडोज देण्यात आला. रियाने सर्वांना सांगितले की सुशांतला डेंग्यू झाला आहे.
रिया सुशांतला कोणताही चित्रपट साइन करण्यास परवानगी देत नव्हती. जेव्हा कोणता प्रस्ताव यायचा तेव्हा ती या गोष्टीचा दबाव त्याच्यावर टाकायची की सुशांतने ही अट ठेवावी की तो चित्रपट तेव्हाच करेल जेव्हा रिया त्यात मुख्य अभिनेत्री असेल. सुशांतच्या सर्वात विश्वासू आणि जुन्या कर्मचार्यांना रियाने बदलले होते आणि त्या लोकांना ठेवले होते जे तिला ओळखायचे. जेणेकरून सुशांतवर प्रत्येकवेळी लक्ष ठेवले जावू शकेल.
डिसेंबर 2019 मध्ये रियाने सुशांतचा नंबर जबरदस्तीने बदलला ज्यामुळे तो आपल्या कुटूंबियांशी आणि त्या व्यक्तींशी बोलू नये ज्याच्या तो अगदी जवळचा होता. रियाने सुशांतला पाटणा येथे जाऊन त्याच्या कुटुंबियांना भेटण्यावर देखील बंदी घातली होती. 2019 मध्ये सुशांतच्या खात्यात 17 कोटी रुपये होते परंतु पुढच्या काही महिन्यांत त्याच्या खात्यातून 15कोटी रुपये काढून घेण्यात आले. ही रक्कम अशा खात्यांना पाठविली गेली होती ज्यांचा सुशांतशी काही संबंध नव्हता. रिया आणि तिच्या कुटुंबियांच्या खात्यात किती पैसे आले आणि कोठून आले याची चौकशी झाली पाहिजे. असे सुशांतच्या वडिलांनी मागणी केली आहे.