Beauty Tips : चेहऱ्याला तरूण आणि सुंदर बनविण्यासाठी असा करा कॉफीच्या फेसपॅकचा वापर….

चेहऱ्यासाठी कॉफी(coffee) खूप चांगला घटक आहे, ज्याद्वारे तुम्ही एकाच वेळी अनेक समस्या दूर करून चेहऱ्याला तरूण आणि सुंदर बनवू शकता. जर तुमचा चेहरा खूप निस्तेज दिसत असेल किंवा वाढत्या वयाचा परिणाम दिसून येत असेल तर अशा परिस्थितीत कॉफीपासून तयार केलेला फेसपॅक तुम्ही लावू शकता.

मृतपेशी काढून टाकण्यासाठी (remove dead cells)-

दूध आणि कॉफीचा फेसपॅक त्वचेतील मृतपेशी नष्ट करण्यास मदत करते. हा फेसपॅक लावल्यानंतर तुम्हाला ताजेतवाणे वाटेल. तसेच डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि सूज दूर करण्यास देखील मदत होईल.

dead-skin

Beauty Tips : केसांच्या सर्व समस्यांवर उपचार करेल अंड्याचा मास्क –

तरूण त्वचेसाठी (for youthful skin)-

तरूण त्वचेसाठी कॉफी आणि हळदीचा फेसपॅक तुम्ही लावू शकता. हळद त्वचेची क्लिनिंग-टोनिंग करण्यासाठी चांगला एँटीऑक्सीडंट आहे. या फेसपॅकमध्ये कॉफी पावडर आणि दही देखील मिसळू शकता. हे तिनही घटक चेहऱ्याचा रंग सुधारण्यास आणि चेहऱ्यावरील मृतपेशी हटविण्यास मदत करतात. हा फेसपॅक बनविण्यासाठी कॉफी पावडर, दही आणि हळद पावडर एकत्र करून चेहऱ्य़ावर लावा त्यानंतर १०-१५ मिनिटांनी पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.

Use-coffee

beauty-tips : त्वचा आणि केसांसाठी बीटाच्या मास्कचे फायदे –

निरोगी त्वचेसाठी (for healthy skin)-

निरोगी त्वचेसाठी कॉफी आणि मधाच्या फेसपॅकचा(Coffee and honey facepacks) वापर तुम्ही करू शकता. कॉफी त्वचेसाठी सर्वोत्कृष्ट एक्सफॉलिएटर आहे. दरम्यान, रक्त प्रवाह वाढविण्यात देखील मदत करते, जे आपल्या त्वचेसाठी उत्तम आहे. मध त्वचेच्या पेशी घट्ट करते आणि निरोगी त्वचा देते. यामुळे त्वचेवर केवळ चमक येत नाही तर केस देखील निरोगी होतात. हा फेसपॅक बनविण्यासाठी एक चमचा कॉफी पावडर आणि एक चमचा मध घ्या. त्यानंतर हे एकत्र मिसळा हा मास्क चेहरा आणि केसांना लावा. काही वेळाने चेहरा आणि केस चांगल्याप्रकारे धुवा. हा मास्क आठवड्यातून दोनवेळा लावू शकता.
Use coffee in some way, get rid of the effects of aging along with dead skin.


Beauty Tips :‘या’ आयुर्वेदिक सौंदर्य टिप्सच्या मदतीने मिळवा सुंदर त्वचा…. –

Beauty Tips…जाणून घ्या सहा आयुर्वेदिक सौंदर्य टिप्स ज्या वर्षभर तुमच्या त्वचेचे रक्षण करतील!

Beauty Tips :सुंदर त्वचेसाठी मूगडाळीचा करा असा वापर…..

Beauty Tips : अतिरिक्त केसांची समस्या दूर करण्यासाठी लावा मूगडाळीचा फेसपॅक!

Social Media