अजय देवगणचा ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपट १३ ऑगस्टला OTT वर होणार प्रदर्शित!

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या(Ajay Devgan) ‘भुजःद प्राइड ऑफ इंडिया’(Bhuj : The Pride of India’) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली आहे. हा चित्रपट स्वतंत्र्य दिनाच्या निमित्ताने १३ ऑगस्टला डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपीवर प्रदर्शित होणार आहे. मुख्य भूमिकेत असलेला अजय देवगनचा हा पहिला चित्रपट आहे, जो थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर(OTT Platform) प्रदर्शित होणार आहे.

अजय देवगणच्या ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित….

The release date of Ajay Devgn’s ‘Bhuj: The Pride of India’ is fixed.

भुज-द प्राइड ऑफ इंडिया चित्रपटात संजय दत्त(Sanjay Dutt), सोनाक्षी सिन्हा(Sonakshi Sinha), एमी विर्क(Amy Virk), नोरा फतेही (Nora Fatehi )आणि शरद केळकर (Sharad Kelkar)देखील मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. मंगळवारी अजय ने चित्रपटाचा मोशन पोस्टर सामायिक करून याची झलक प्रेक्षकांना दाखविली आणि प्रदर्शनाची तारीख देखील जारी केली. भुज चित्रपटाची कथा १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी घडलेल्या एका खऱ्या आणि धाडसी घटनेवर आधारित आहे. या युद्धाला यावर्षी ५० वर्ष पूर्ण होतील.

तमिळ सुपरहिट चित्रपट ‘रत्सासन’ च्या हिंदी रिमेकमध्ये अक्षय कुमारची वर्णी… – 

अजय भारतीय वायुसेनेच्या पथकाचे प्रमुख विजय कर्णिक यांची व्यक्तीरेखा साकारणार आहे, जे भुज विमानतळाचे प्रभारी होते. मोशन पोस्टरमध्ये असे दाखविण्यात आले आहे की- १९७१ मध्ये पाकिस्तानने ऑपरेशन चंगेज खान सुरू केले होते. पाकिस्तानने १४ दिवसांमध्ये ३५ वेळा भुज एअरफिल्डवर ९२ बॉम्ब आणि २२ रॉकेटद्वारे हल्ला केला होता.

रकुल प्रीत सिंगने टॉलिवूडमध्ये काम मिळत नसल्याच्या वृत्ताचे केले खंडन.. – 

संजय दत्त रणछोडदास पागी यांच्या भूमिकेत दिसून येणार आहे. एमी विर्क विक्रम सिंह बाज जेठज यांच्या भूमिकेत असून सोनाक्षी सिन्हा सुंदरबेन जेठा यांची भूमिका साकारताना दिसून येणार आहे. तर, नोरा फतेही रहमान नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. चित्रपटाचा ट्रेलर १२ जुलै रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. भुज चित्रपटाची निर्मिती अजय देवगनने केली आहे, तर दिग्दर्शन अभिषेक दुधैया यांनी केले आहे.
BHUJ: Ajay Devgan’s ‘Bhuj – The Pride of India’ release date confirmed, know when and where you can watch the film.


हसीन दिलरूबा चित्रपटाऐवजी हॉलिवूड चित्रपट ‘द टुमॉरो वॉर’ला प्राधान्य दिल्याने तापसी भडकली…. –

हसीन दिलरूबा चित्रपटाला प्रेक्षक, समीक्षकांकडून मिळणाऱ्या संमिश्र प्रतिसादामुळे तापसी पन्नू भडकली….

ईडीने अभिनेत्री यामी गौतमला मनी लॉन्ड्रिंग संदर्भात पाठविली नोटीस…. –

ईडीने अभिनेत्री यामी गौतमला मनी लॉन्ड्रिंग संदर्भात पाठविली नोटीस….

Social Media