नवी दिल्ली, तुम्ही जर स्वस्त सोने खरेदी करण्याचा विचार करीत असाल किंवा मग तुम्ही सोन्यात गुंतवणूकीचा विचार करीत असाल तर, सोमवारपासून तुम्हाला एक उत्तम संधी मिळणार आहे. वास्तविक, १२ जुलैपासून सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीम २०२१-२२ (सार्वभौम गोल्ड बाँड योजना २०२१-२२ मालिका IV) च्या चौथ्या मालिकेची विक्री सुरू होणार आहे. ही व्रिक्री १६ जुलैपर्यंत सुरू असेल. रिझर्व्ह बँकेद्वारे (RBI) जारी केलेल्या अहवालानुसार, या मालिकेत प्रति ग्रॅम सोन्याची किंमत ४,८०७ रूपये निश्चत करण्यात आली आहे. सरकारच्या वतीने आरबीआय सॉव्हरेन गोल्ड बाँड(Sovereign Gold Bond Scheme) जारी करते.
सॉव्हरेन गोल्ड बाँड २०२१-२२ची चौथी शाखा सोमवारपासून पाच दिवसांसाठी वर्गणीसाठी (सब्सक्रिप्शन) उघडेल. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, बाँडसाठी जर तुम्ही ऑनलाईन अर्ज केलात तर तुम्हाला प्रति ग्रॅम ५० रूपयांची सूट मिळेल. म्हणजेच अशा गुंतवणूकदारांसाठी एका ग्रॅम सोन्याच्या बाँडची किंमत ४,७५७ रुपये असेल. तुम्ही गोल्ड बाँडची खरेदी ऑनलाइन करू शकता.
मंत्रालयानुसार, हा बाँड सर्व बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), पोस्ट ऑफिस आणि मान्यता प्राप्त स्टॉक एक्सचेंज (Stock Exchanges), एनएसई (NSE), आणि बीएसई (BSE) मार्फत विकला जाईल. तर स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँकेत यांची विक्री केली जात नाही.
या योजनेत एका आर्थिक वर्षात एखादी व्यक्ती जास्तीत जास्त 4 किलो सोन्याच्या बाँडची खरेदी करू शकते. तर किमान गुंतवणूक एक ग्रॅम असणे आवश्यक आहे. तसेच ट्रस्ट किंवा यासारख्या संस्था २० किलोपर्यंत सोन्याच्या बाँडची खरेदी करू शकतात. याकरता जारी होणारे अर्ज 1 ग्रम किंवा त्याच्या पटीमध्ये असतात. बाँडची किंमत, इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लि. (IBJA) द्वारे दिलेल्या 999 शुद्धतेच्या सोन्याच्या सरासरी बंद किंमतीच्या आधारे निश्चित करण्यात आली आहे.
Good news: Cheap gold will be available from July 12! The government will give a chance to buy cheaply.