तुळशी तलाव भरुन वाहू लागला; मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी सर्वात लहान तलाव

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या आणि बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातच असणा-या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा ‘तुळशी तलाव’(‘Tulsi Lake’) आज दिनांक १६ जुलै २०२१ रोजी सकाळी ११ वाजता पूर्ण भरुन वाहू लागला आहे. गेल्या वर्षी २७ जुलै २०२० रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास हा तलाव भरुन वाहू लागला होता.

८०४६ दशलक्ष लीटर उपयुक्‍त जलधारण क्षमता असणारा हा तलाव वर्ष २०१९ मध्ये दिनांक १२ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्‍या आधीच्‍या वर्षी म्‍हणजेच वर्ष २०१८ मध्‍ये दिनांक ९ जुलै रोजी; वर्ष २०१७ मध्‍ये दिनांक १४ ऑगस्‍ट रोजी आणि वर्ष २०१६ मध्‍ये १९ जुलै रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला होता.

बृहन्‍मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव असून यातून दररोज सरासरी १८ दशलक्ष लीटर (१.८ कोटी लीटर) एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

तुळशी तलावाबाबत महत्त्वाची माहिती संक्षिप्त स्वरुपात पुढीलप्रमाणे आहे.

The important information about Tulsi Lake is briefly as follows.

  • बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे ३५ किलोमीटर (सुमारे २२ मैल) अंतरावर हा तलाव आहे.
  • या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन १८७९ मध्ये पूर्ण झाले.
  • या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे ४० लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता.
  • या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.७६ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे १.३५ चौरस किलोमीटर एवढे असते.
  • तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्‍त पाणीसाठा हा ८०४.६ कोटी लीटर एवढा असतो. (८०४६ दशलक्ष लीटर)
  • हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे विहार तलावाला जाऊन मिळते.

The ‘Tulsi Lake’ of the Municipal Corporation, one of the two lakes that supply water to the Brihanmumbai Municipal Corporation area and is located in the Brihan Mumbai Municipal Corporation area, has started flowing completely today at 11 am on July 16, 2021. The lake started overflowing around 12noon on July 27, 2020 last year.


संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला सर्वोतोपरी करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज –

संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला सर्वोतोपरी करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मालमत्ता ईडी ने केल्या जप्त –

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा वरळीतील फ्लॅट आणि कोकणातील जमीन ईडी ने केली जप्त

Social Media