नवी दिल्ली : टी-सीरिज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांच्याविरूद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूषण कुमार यांच्यावर काम मिळवून देण्याच्या नावाखाली ३० वर्षीय महिलेचे शोषण केल्याचा आरोप आहे. मुंबईतील डीएन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने आरोप केला आहे की, तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. पीडितेने असेही म्हटले आहे की, आतापर्यंत ती गप्प होती कारण भूषण कुमारने तिची छायाचित्रे आणि व्हिडीओ समूह माध्यमांवर सामायिक करण्याची धमकी दिली होती. भूषण कुमारविषयी सांगायचे झाले तर तो केवळ टी-सीरिजचा व्यवस्थापकीय संचालक नसून तो अनेक मोठ्या चित्रपटांच्या निर्मितीचे काम देखील सांभाळतो.
पीडित महिलेने तिच्या तक्रारीत आरोप केला आहे की, भूषण कुमारने त्याच्याच कंपनीत काही प्रोजेक्ट्समध्ये नोकरी देण्याचा अमिष देऊन शोषण केले आहे. महिलेचे म्हणणे आहे की, तिची फसवणूक करण्यात आली आहे आणि त्यामुळेच तिने पोलिसांना संपर्क केला आहे. पोलिसांनी भूषण कुमारविरूद्ध भादंवि कलम ३७६ (लैंगिक गैरवर्तन), ४२० (फसवणूक), ५०६ (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
यापूर्वी देखील मीटू च्या माध्यमातून मॉडेल मरीना कुंवरने देखील भूषण कुमारवर शोषणाचा आरोप केला होता. भूषण कुमारवर मरीना कुंवरने अनेक गंभीर आरोप केले होते. काही दिवसांपूर्वीच गायक सोनू निगमने देखील भूषण कुमारला व्हिडिओ सामायिक करुन पोल खोलण्याची धमकी दिली होती, त्यानंतर सोनू निगमने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते.
Case filed against Bhushan Kumar, woman alleges sexual abuse on the pretext of getting work.A case of sexual assault has been registered against Bhushan Kumar, managing director of t-series company. Bhushan Kumar is accused of exploiting a 30-year-old woman in the name of getting work. A case has been registered at DN police station in Mumbai. The woman has alleged that she has been tortured at three different places.
लोकप्रिय टॉक शो पिंच-२ पुन्हा एकदा होणार प्रसारित…. –
अरबाज खानचा लोकप्रिय टॉक शो पिंच-२ पुन्हा एकदा होणार प्रसारित….
कॉकटेल चित्रपटातील ‘वरोनिका’ने माझे व्यावसायिकदृष्ट्या आयुष्यच बदलले : दीपिका पादुकोण