नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे (RBI) मास्टरकार्डवर (Master Card) नवीन डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि प्रीपेड कार्ड देण्यास बंदी घातली आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे अनेक बँकांसाठी अडचण निर्माण झाली आहे. यामुळे ज्या बँका पूर्णपणे मास्टरकार्डवर अवलंबून आहेत, त्यांना त्यांचा व्यवहार व्हिसा किंवा घरगुती रूपेमध्ये (RuPay) शिफ्ट करावा लागेल आणि या सगळ्यासाठी किमान दोन महिने लागतील. याचा परिणाम त्यांच्या कमाईवर तर होईलच याशिवाय पेमेंट (देय) सारख्या सेवांवर देखील होईल.
मास्टरकार्डला नवीन कार्ड देण्यास बंदी
Ban on issuing new cards to MasterCard
भारतीय रिझर्व्ह बँकेने मास्टरकार्डवर लोकल डेटा स्टोरेज नियमांचा हवाला देत मास्टरकार्डला नवीन कार्ड देण्यास बंदी घातली आहे. मास्टरकार्डवर केंद्रीय बँकेने २२ जुलैपासून नवीन ग्राहकांना ऑन-बोर्ड करण्यावर देखील बंदी घातली आहे. आरबीआय ने एप्रिल २०१८ मध्ये देय सेवा प्रदान करणाऱ्या सर्व कंपन्यासाठी, आणि फिनटेकसाठी (Financial technology) डेटा स्टोरेजशी (माहिती संग्रह) संबंधित नियम जारी केले होते. २०१८ च्या या नियमांनुसार, विदेशी कंपन्यांना पेमेंट डेटा लोकल सर्व्हरवर ठेवावा लागेल. तर मास्टरकार्डवर या नियमांचे पालन न केल्याचा आरोप आहे.
‘या’ बँकांचे खासगीकरण होण्याची शक्यता! –
सर्वाधिक परिणाम देशातील पाच बँकांवर होणार
Five banks in the country will be the worst affected
मास्टरकार्डवरील बंदीचा सर्वाधिक परिणाम देशातील पाच बँकांवर होणार आहे. यामध्ये खासगी क्षेत्रातील ऍक्सिस बँक (Axis Bank), यस बँक (Yes Bank), इंडसइंड बँक यांचा समावेश असून सरकारी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक (SBI) आणि बजाज फिनसर्व्ह सामील आहे. ग्लोबल ब्रोकरेड कंपनी नोमुरा (Nomura) च्या अहवालानुसार, आता अशा सुमारे सात वित्तीय संस्था किंवा बँका आहेत ज्या नवीन कार्ड जारी करू शकणार नाहीत. याचे कारण म्हणजे त्या बँका मोठ्या संख्येने मास्टरकार्डद्वारे कार्ड घेतात.
भारताची ग्राहक डिजिटल अर्थव्यवस्था २०३०पर्यंत ८०० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज –
अहवालानुसार, सर्वाधिक प्रभावित होणाऱ्या बँकामध्ये आरबीएल बँक, येस बँक आणि बजाज फिनसर्व्ह आहेत. कारण या बँका कार्ड जारी करण्याच्या बाबतीत मास्टरकार्डवर पूर्णपणे अवलंबून आहेत. तर इंडसइंड बँक, ऍक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत अवलंबून असून एसबीआय आणि एसबीआय कार्ड त्यांच्या एकूण कार्डपैकी १० टक्के मास्टरकार्ड जारी करतात.
Banks panic with Master Card Ban! Cards of 5 banks including SBI, Axis will be affected, read what will be the effect on your credit?
RBIची मास्टरकार्ड कंपनीवर मोठी कारवाई; नवीन क्रेडिट, डेबिट, प्रीपेड कार्ड ग्राहक बनविण्यावर बंदी! –
RBIची मास्टरकार्ड कंपनीवर मोठी कारवाई; नवीन क्रेडिट, डेबिट, प्रीपेड कार्ड ग्राहक बनविण्यावर बंदी!
पेटीएम घेऊन येत आहे देशातील सर्वात मोठा IPO –
पेटीएम घेऊन येत आहे देशातील सर्वात मोठा आयपीओ, सेबीकडे अर्ज दाखल!