कोरोनानंतर आता नवीन प्राणघातक ‘मंकी बी’ विषाणूची नोंद, चीनमध्ये एकाचा मृत्यू……

बीजिंग : चीनमधून पसरलेल्या कोरोना विषाणूचा(Corona virus) कहर अद्याप कमी झालेला नसून दरम्यान एक नवीन विषाणू ‘मंकी बी’ (BV) आढळून आला आहे. कोरोनाचे पहिले प्रकरण वुहान मध्ये आढळले होते आणि या नवीन प्राणघातक विषाणूमुळे बीजिंगमध्ये एका मृत्यूची नोंद देखील झाली आहे. वास्तविक, बीजिंगमधील एका पशुवैद्यकीय डॉक्टरचा मृत्यू या नवीन विषाणूच्या संसर्गामुळे झाला आहे ज्याची पुष्टी चीन ने केली आहे.

माध्यमांद्वारे प्रकाशित झालेल्या अहवालात, चीनच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या इंग्रजी प्लॅटफॉर्मचा हवाला देण्यात असून यामध्ये म्हटले आहे की, नवीन विषाणूची लागण झालेल्या पशुवैद्यकाने उपचारासाठी अनेक रूग्णालयांना भेट दिली होती परंतु २७ मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या संपर्कात आलेले लोक सुरक्षित आहेत. याव्यतिरिक्त अहवालात असेही म्हटले आहे की, चीनमध्ये यापूर्वी BV विषाणूचे एकही प्रकरण समोर आले नव्हते म्हणजेच चीनमध्ये बीव्ही संसर्गाचे हे पहिले मानवी प्रकरण आहे.

कोरोनाचा मुलांच्या तुलनेत मुलींवर अधिक प्रभाव : अभ्यास –

मिळालेल्या माहितीनुसार, मार्चच्या सुरूवातीलाच या ५३ वर्षीय डॉक्टराने दोन मृत माकडांवर शस्त्रक्रिया केली होती, त्याच्या एक महिन्यानंतर त्यांची तब्येत बिघडू लागली आणि उलट्या सुरू झाल्या होत्या. नॉन ह्यूमन प्रायमेट्सवर संशोधन करणाऱ्या संस्थेसाठी या पशुवैद्यकाने काम केले होते. एप्रिल मध्ये डॉक्टरांच्या तपासणीसाठी सेरेब्रोस्पायनल फ्लूड (Cerebrospinal Fluid) घेण्यात आले त्यानंतर परिणाम बीव्ही पॉझिटिव्ह असल्याची पुष्टी झाली.

फायझर आणि मॉडर्नाच्या वॅक्सीनमुळे हृदयाला सूज –

महत्वाचे म्हणजे या मंकी बी विषाणूची ओळख सर्वात प्रथम १९३२ मध्ये झाली होती. हा विषाणू जीनस मकाका(genus Macaca) च्या आफ्रिकी माकडांमध्ये आढळणारा अल्फाहर्पीसव्हायरस एनझूटिक (alphaherpesvirus enzootic) आहे. विशेष म्हणजे यामध्ये देखील संसर्ग पसरण्याची क्षमता खूप अधिक आहे आणि हे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरते.
Monkey B Virus knocked amidst the havoc of Corona, one death in China.


कोरोना काळात मुलांच्या लसीकरणावर वाईट परिणाम –

कोरोना काळात मुलांच्या लसीकरणावर वाईट परिणाम, २.३ कोटी मुले डीटीपी लसीपासून वंचित!

झायडस कॅडिलाने १२-१८ वर्षे वयोगटातील मुलांवर केले लसीचे परिक्षण… –

झायडस कॅडिलाने १२-१८ वर्षे वयोगटातील मुलांवर केले लसीचे परिक्षण…

Social Media