महाडमध्ये पुराचे पाणी ओसरायला सुरुवात; बचावकार्य सुरु, हेलिकॉप्टर तैनात, एनडीआरएफही हजर

महाड : अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झालेल्या महाड शहर( Mahad city ) आणि जवळच्या गावांमध्ये पुराचे पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने थोडा दिलासा मिळाला असून, पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरु झाले आहे.

पुराचे पाणी आणि अनेक ठिकाणी कोसळलेल्या दरडीमुळे लोक ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. रात्रभर नागरिक पुराच्या पाण्यात अडकून पडल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुराचे पाणी भरल्याने रस्ते बंद झाल्याने बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टरची मागणी केली होती. आज बचाव कार्यासाठी नेव्हीचे हेलीकॉप्टर दाखल झाले आहे. नौदलाचे पथकही मदतीसाठी दाखल झाले आहे.

पाचाड रस्त्यावर आलेली दरड बाजूला करण्यात यश आले असून माणगाव-पाचाड मार्गे महाड रस्ता मोकळा झाला आहे. मात्र महाडमध्ये मोबाईल आणि अन्य संपर्क यंत्रणा अजूनही ठप्प असल्याने संपर्क तुटला आहे.

सावित्री नदी (Savitri river)अजूनही धोका पातळीवरून वाहत आहे. महाडमध्ये विविध भागात लोक अडकले आहेत.

Floodwater has started receding in Mahad city and nearby villages which have been flooded due to heavy rains. The rain has brought some relief as it has taken some rest and rescue operations have been launched to evacuate the civilians trapped in the floodwaters. The Savitri river is still flowing from the danger level. People are stranded in various areas in Mahad.


कोल्हापूर पुन्हा एकादा महापुराच्या विळख्यात – 

कोल्हापूर पुन्हा एकादा महापुराच्या विळख्यात

 

Social Media