30 व्या डॉ. वसंतराव देशपांडे स्मारक संगीत महोत्सवाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते उद्घाटन

नागपूर  : 30 व्या डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत महोत्सवाचे उद्घाटन आज सायंकाळी 6 वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Union Minister Nitin Gadkari) यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.. या प्रसंगी ज्येष्ठ संगीतकार आणि गुरू पंडित नारायणराव मंगरुळकर आणि माजी उद्घोषक व अखिल भारतीय रेडिओ नागपूरच्या लेखिका श्रीमती प्रभा देउस्कर यांना सन्मानित करण्यात आले…

“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत डॉ. वसंतराव देशपांडे(Dr. Vasantrao Deshpande) यांच्या स्मरणार्थ, दक्षिण मध्य विभाग सांस्कृतिक केंद्र(South Central Division Cultural Centre), नागपूर दरवर्षी संगीत महोत्सवाचे आयोजन करते. आज 30, 31 जुलै आणि 1 ऑगस्ट 2021 रोजी संध्याकाळी 6.00 वाजता “30 व्या डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत महोत्सव” आयोजन करण्यात आले आहे. कोविड-19च्या संसर्गाच्या प्रतिबंधात्मक निर्बंधामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही  हा महोत्सव व्हर्चुअल ऑनलाईन माध्यमातून साजरा होत आहे. या सोहळ्यात शास्त्रीय गायन, वाद्य, नृत्य आणि नाट्यसंगीताची सादरीकरणे होत आहेत.

यावेळी नितीन गडकरी यांनी, प्रख्यात गायक आणि नाट्य कलाकार डॉ. वसंतराव देशपांडे यांचे स्मरण करून, या महोत्सवाचे आणि समारंभात सहभागी झालेल्या कलाकारांचे अभिनंदन केले आणि 30 वर्षे हा उत्सव चांगल्या प्रकारे आयोजित केल्याबद्दल दक्षिण मध्य विभाग सांस्कृतिक केंद्र नागपूरचे  अभिनंदन केले.

1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे औचित्य साधून यंदा या कार्यक्रमात ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ साजरा करण्याचा दुग्ध शर्करायोग जुळून आला आहे. दक्षिणमध्य विभाग सांस्कृतिक केंद्राच्या वतीने  स्व. लोकमान्य टिळक(Lokmanya Tilak) यांचे पुण्यस्मरण करण्यात येत आहे.

यानंतर पंडित जयतीर्थ मेउंडी यांच्या शास्त्रीय गायनाचे प्रथम सादरीकरण झाले.. यात त्यांनी यमन राग “दे पिया बिन रतिया” या बंदिशीने आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली. यानंतर स्वतः राग यमन कल्याणमध्ये ‘तराना’ चे सादरीकरण केले.. यानंतर, राग मिया मल्हारमध्ये त्यांनी “धूम धूम” आणि “या भवनातील गीत पुराणे” या प्रसिद्ध नाट्यसंगीताचे मंत्रमुग्ध सादरीकरण केले. “छंद मजला विठ्ठलाचा” या मराठी अभंगाच्या सादरीकरणाने त्यांनी आपल्या गायनाची सांगता केली. त्यांना तबल्यावर पांडुरंग पवार आणि हार्मोनियमवर अभिषेक शिनकर यांनी साथ दिली.

या कार्यक्रमाचे दुसरे सादरीकरण पद्मश्री पंडित भजन सोपोरी यांच्या संतूर वादनाने झाली.. त्यांनी राग कौंसी कनाडा में “आलप और जोड-झाला” च्या सादरीकरणाने आणि नंतर रुद्रताल आणि तीनताल मधील “गत” ची सुरुवात केली आणि “कश्मीरिका अंग” या गाण्याच्या सादरीकरणाने समारोप केला.. त्यांच्यासोबत तबल्यावर  दुर्जय भौमिक, पखावजवर ऋषी शंकर उपाध्याय आणि घटम वर वरुण राजशेखरन यांनी साथ दिली.

उद्या 31 जुलै  रोजी शनिवारी प्रथम सादरीकरण “शास्त्रीय गायन” चे श्री अनिरुद्ध देशपांडे सादर करणार आहेत. व्दितीय सादरीकरण मध्य प्रदेशातील उज्जैनच्या डॉ. पल्लवी किशन आणि त्यांच्या ग्रुपतर्फे ‘कथक नृत्याचे सादरीकरण होणार आहे. तृतीय सादरीकरण बासरी जुगलबंदी पंडित प्रवीण गोडखिंडी आणि श्री शादज गोडखिंडी यांचे होणार आहे.

रविवारी 1 ऑगस्ट 2021 रोजी हा संगीताचा कार्यक्रम श्रीमती संपदा माने आणि सहकारी ‘मैफील नाट्यसंगीताची’ हा संगीतमय कार्यक्रम सादर करणार  आहेत. या कार्यक्रमात डॉ वसंतराव देशपांडे, पंडित बाळ गंधर्व, पंडित जितेंद्र अभिषेकी आणि पंडीत दिनानाथ मंगेशकर यांच्या नाट्यगीतांचा आस्वाद घेता येणार आहे…

दक्षिण मध्य विभाग सांस्कृतिक केंद्र, नागपूर आणि सर्व अद्यतनांसाठी फेसबुक https://www.facebook.com/SCZCC/,  ट्विटर https://twitter.com/SCZCC आणि इंस्टाग्राम https: // www .instagram.com/sczcc.culture/?hl=en शी संबंधित सर्व माध्यमाशी आपण जुळू शकता..

 

 

Social Media