देशात सर्वाधिक वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा उच्चांक नोंदविणारे शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव अण्णासाहेब देशमुख यांचे सोलापुरातील खासगी रुग्णालयात शुक्रवारी रात्री निधन झाले(Ganpatrao Deshmukh passes away). ते ९४ वर्षांचे होते. देशमुख यांना काही दिवसांपूर्वी पित्ताशयाच्या आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना कृत्रिम जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. आदरणीय माजी अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब यांच्याकडे काम करत असतांना अनेकदा गणपतराव देशमुख पत्र, निवेदन घेऊन येत असत. तेव्हाच त्यांच्याशी ओळख झाली.
सलग ११ वेळा आमदार म्हणून निवडून आले असल्याने त्यांच्या बद्दल जरा जास्तच आदर होता. आमचे सुधीरभाऊ अर्थमंत्री असतांना कितीही कामात असले तरी गणपतराव आले की त्यांना आवर्जून वेळ देत असत. त्यांच्या निवेदन किंवा पत्रावर मार्किंग करून तात्काळ मार्गी लावत होते. त्यामुळे बरेचवेळा गणपतराव खाजगीमध्ये माझ्याशी बोलायचे की, “सुधीरभाऊ सारखा नेता नाही, माझच काय पण कुणाचही कुठलेही अडू देत नाहीत त्यांच्यासारखा नेता लाभण हे विदर्भाच नाही महाराष्ट्राच भाग्य आहे. मंत्री कार्यालयात किती दा चकरा मारा पण कामे होत नाहीत. सुधीर भाऊच्या मंत्री कार्यालयात मी पत्र दिले की कार्यवाही होते. अनेक मंत्री नुसते आश्वासन देतात मात्र त्याचा पाठपुरावा तर सोडा साध पत्र देखील त्यांच्या कार्यालयातून बाहेर पड़त नाही. मात्र सुधीरभाऊ असा मंत्री आहे की, ते बोलले की शासन आदेश निर्गमित होतात. जे बोलतात ते करून दाखवतात त्यांनी महाराष्ट्राला ‘हरित महाराष्ट्र’ करण्याचे स्वप्न बघितले आहे ते पूर्ण होईल” अशी आशा त्यांनी तेव्हा व्यक्त केली होती. तुम्ही एका चांगल्या नेत्याकडे काम करताय अस ही ते मला बोलले होते. त्यांच्या मनात सुधीरभाऊ बद्दल प्रचंड आदर होता. हे मला त्यांच्या बोलान्यातुन अनेकदा जाणवल.
मंत्री कार्यालयात आले की त्यांची भेट व्हायची तसा त्यांच्याशी संबंध येत होता. एकदा नागपुर अधिवेशन सुरू असतांना मला भूक लागली. मग अधिवेशन परिसरात महिला बचत गटच्या स्टॉल झुनका भाकर जेवायला गेलो. तिथे गणपतरावजी झुनका भाकर जेवत होते. त्यांना बघताच नमस्कार केला. त्यांनी मला त्यांच्या बाजूला बसायला जागा दिली. माझ्यासाठी त्यांनी एक थाली लावायला सांगितली. जेवत असतांना त्यांनी बऱ्याच विषयावर चर्चा केली. मंत्रालयात वांरवार भेटी होत त्यामुळे त्यांच्याशी तोंड ओळख झाली होती. पण असा आमदार माझ्या अख्ख्या आयुष्यात मी आजपर्यंत बघितला नाही. त्यांच्यामध्ये माजी मंत्री किंवा आमदारकीचा रुबाब कधीही दिसला नाही एवढा साधेपना, नम्रता त्यांच्यात ठासुन भरला होता. आज एक टर्म राहिलेले आमदार बघितले तरी त्यांचा रुबाब आणि जगण्याची शैली, राहणीमान बदलून गेलेली दिसते मात्र गणपतराव अपवाद होते.
देशमुख यांच्या निधनाने जुन्या पिढीतील एक राजकीय नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. देशमुख हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या एकाच मतदारसंघातून आणि एकाच पक्षाकडून सर्वाधिक अकरावेळा निवडून आले. एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे दिवंगत नेते एम. करुणानिधी यांचा विक्रम त्यांनी मोडला होता. मोहोळ तालुक्यातील पेनूर येथे १० ऑगस्ट १९२६ रोजी शेतकरी कुटुंबात जन्म झालेले देशमुख हे वकिली व्यवसायामुळे सांगोला येथे स्थायिक झाले. त्यावेळी सुरू झालेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी झोकून दिले. १९६२ साली देशभरात काँग्रेसचे वर्चस्व असतानाही सांगोला विधानसभा निवडणुकीत शेकापकडून देशमुख उभे राहिले आणि वयाच्या ३४ व्या वर्षी ते पहिल्यांदा आमदार झाले. १९७२ साली त्यांना पराभव पत्करावा लागला. तत्कालीन आमदार काकासाहेब साळुंखे यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक झाली. त्यात गणपतराव देशमुख निवडून आले. नंतर १९९५ सालचा अपवाद वगळता ते २०१९ पर्यंत म्हणजे तब्बल ५२ वर्षे आमदार राहिले. आमदारकीचा बहुतांशी काळ ते विधिमंडळात विरोधी बाकावर बसले. १९७८ साली शरद पवार यांच्या पुलोद सरकारमध्ये आणि नंतर १९९९ साली शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हा देशमुख यांनी मंत्रिपद सांभाळले. २०१९ साली वृध्दापकाळामुळे त्यांनी राजकारणातून निवृत्ती पत्करली. त्यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख हे त्यांचे राजकीय वारसदार झाले. परंतु विधानसभा निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला.
चार पिढ्यांतील मतदारांशी नाळ जोडणारे गणपतराव देशमुख हे साधी राहणी, स्वच्छ प्रतिमा, वैचारिक ध्येयनिष्ठा यासाठी ओळखले जात. विधिमंडळात अनेक विधेयकांवर त्यांनी केलेली अभ्यासपूर्ण भाषणे आजही संस्मरणीय ठरतात. मनोहर जोशी व नारायण राणे यांचा अपवाद वगळता यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत जवळपास सर्व मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ त्यांनी प्रत्यक्ष पाहिला आणि अनुभवला.
वर्ल्ड गिनीज बुकमध्ये नोंद…
Recorded in the World Guinness Book…
गणपतराव देशमुख यांनी ११ वेळेस विधानसभा जिंकल्यामुळे वर्ल्ड गिनीज बुकमध्ये त्यांच्या कारकिर्दीची नोंद झाली आहे. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री कै एम करूणानिधी हे १० वेळेस विजयी झाले होते. २०१२ मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विधानसभा सभागृहात राज्य सरकारने त्यांचा यथोचित गौरव केला. हा सत्कार माझा नसून तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा सत्कार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले होते.
—————————-
आवडलेली महत्त्वपूर्ण पोस्ट
श्री. प्रशांत भामरे सरांच्या वॉल वरून…
माजी मंत्री गणपतराव देशमुख साहेब आज आपल्यातुन गेले, ते विलासरावांच्या देशमुख साहेबांच्या मंत्रिमंडळात मंत्री असताना माझा मित्र त्यांच्याकडे पीएस होता. एक दिवशी त्यांना कार्यालयाचा राउंड घेत असताना वृत्तपत्रांच्या रद्दीचे गट्ठे एका कोपऱ्यात बांधून पडलेले दिसले. त्यांनी पीएस ना विचारले याचे तुम्ही काय करणार आहात ? त्यांनी सांगितले आजच विकुन टाकतो. गणपतराव देशमुख म्हणले आलेल्या पैश्यांचे काय करणार ? पीएस साहेबाना सुद्धा माहित नव्हतं एव्हढ्या किरकोळ रकमेचं काय करायचं ते ! त्यांनी सांगितलं कि किरकोळ रक्कम आहे सर. गणपतराव देशमुख म्हणाले किरकोळ असो कि काही पण वृत्तपत्र सरकारी पैश्याने कार्यालयात आली आहेत तर त्याच्या रद्दीचे पैसेसुद्धा सरकारी तिजोरीतच गेले पाहिजेत. शोधाशोध घेतल्यावर लक्षात आलं कि असे पैसे जमा करण्यासाठी हेड च नाहीये. मग धावपळ करून हेड निर्माण करावं लागलं !
“मसरूफ़ ज़माना मेरे लिए क्यूं वक़्त अपना बरबाद करे” या साहिरच्या ओळी आठवल्या !
______________
श्री. जी. डी. कुलथे राजपत्रित अधिकारी महासंघ…
Mr. which. D. Kulthe Gazetted Officers Federation…
गणपतराव देशमुख यांना अधिकारी महासंघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली देताना आवर्जून उल्लेख करावा अशी विशेष बाब अशी कीं,दरवर्षी आपण जी डिरेक्टरी प्रकाशीत करतो ती घेण्यास ते स्वतः येत. आम्ही व कार्यालयातील सर्व त्यांना ओळखतात.त्यांना महासंघाची डिरेक्टरी भेट म्हणून देण्याचा आम्ही कितीही आग्रह केला तरी,ते सदर डिरेक्टरी विकतच घेऊन जात होते.डिरेक्टरीचे मनापासून कौतुक करून,तुम्हाला यासाठी कष्टाबरोबरच खर्चही येतोना, हे ते आवर्जून सांगायचे.असे थोर विचारवंत विरळेच. अशा मोठ्या विचारी व्यक्तींच्या सूचनांचे महत्व मोठे असते.विधीमंडळात बोलायला ते जेंव्हा उभे रहात तेंव्हा सभागृह ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष असायचे.या थोर व महान नेत्यास आपली भावपूर्ण श्रद्धांजली.
– मुकेश चौधरी मुंबई. मो.09049068803