कळणे खनिज प्रकल्पात दरड कोसळून बांध फुटला, घरे, शेती बागायतीचे अतोनात नुकसान

दोडामार्ग : सिंधुदुर्ग(Sindhudurg) मधल्या कळणे येथे खनिज प्रकल्पात दरड कोसळून पाणी अडवण्यासाठी चा बांध फुटून आलेल्या लोटाने संपूर्ण गावात चिखल आणि पाणी पसरले आहे . खाणीतील चिखल युक्त तेलकट पाणी मनुष्यवस्ती आणि शेती बागायती मध्ये पसरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.landslide snag in the mineral project and the burst of water

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील कळणे लोहखनिज प्रकल्पात दरड कोसळून बंधारा तुटल्याने कळणे गावात २० ते २५ घरामध्ये खाणीतील चिखलयुक्त तेलकट पाणी घरात गेलं तर ३५ ते ४० हेक्टर जमीन बाधित होऊन भातशेती, नाचणी शेती, सुपारीच्या तसेच काजूच्या बागा नष्ट झाल्या आहेत. गावातील पिण्याचं पाणी दूषित झाल्याने ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत. लोहखनिज युक्त पाणी शेतीत गेल्यामुळे त्याठिकाणी आता शेती उगवणाऱ नसल्याने उदरनिर्वाह कसा करणार हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

त्यामुळे हा धोकादायक तसेच पर्यावरणाला मारक प्रकल्प पुर्णतः बंद झाला पाहिजे अशी ग्रामस्थांची मागणी आहे. लोहखनिज उत्खनन प्रकल्पाचा बंधारा फुटून कळणे गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या नळपाणी योजनेच्या विहिरीत हे चिखलयुक्त पाणी गेल्याने दूषित झालं आहे. त्यासोबत कळणे नदीवर अवलंबून असलेल्या गोव्यातील अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गोव्यातील पेडणे तालुक्यातील पाण्याचा प्रकल्प यामुळे पूर्णपणे बंद करावा लागला आहे.

सुदैवाने ह्याठिकाणी जीवित हानी झाली नसली तरी स्थनिकांच्या रोजीरोटीचा , पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे . खनिज प्रकल्पावर बंदी आणून कडक कारवाईची मागणी स्थानिक करत आहेत.

In The Kalne in Sindhudurg the dam has spread mud and water in the entire village due to a landslide snag in the mineral project and the burst of water. The mud-filled oily water in the mine has caused extensive damage due to spreading in human habitation and agricultural horticulture.


भारतमातेचे नाव घेऊन सत्ता मिळवणारेच भारतमातेला विकायला निघाले ! : नाना पटोले –

भारतमातेचे नाव घेऊन सत्ता मिळवणारेच भारतमातेला विकायला निघाले ! : नाना पटोले

Social Media