चिपळूण : माझ्यावर गुन्हा दाखल झालाय याची माहिती मला नाही, पोलीस पथक निघाले, अटक होणार, नॉर्मल माणूस वाटला काय तुम्हाला, शिवसेना कोण, एखाद्या नेत्याचं नाव सांगा, कोण सुधाकर बडगुजर मी ओळखत नाही, माझी बदनामी कराल तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रश्नकर्त्या पत्रकारांनाच दिला.
मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राणेंविरोधात गुन्हा दाखल झाल्याचं वृत्त आहे. त्यानंतर चिपळूणमध्ये पत्रकार परिषद घेत राणेंनी उत्तर दिलं. मला तुम्हाला सांगायचं आहे, माहिती अभावी मी एकही उत्तर देणार नाही. माझ्यावर गुन्हा दाखल झालाय याची माहिती मला नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. तुम्ही तपासून पाहा, मग आपआपल्या टीव्हीवर दाखवा, नायतर तुमच्याविरोधात माझी केस दाखल होईल.
गुन्हा दाखल नसताना, उगाच अटक होणार वगैरे, काय नॉर्मल माणूस वाटलो काय तुम्हाला? कोणाचं म्हणणं आहे, शिवसेना वगैरे म्हणता, नाव सांगा, कोण शिवसेना? बडगुजर कोण मी ओळखत नाही, असं राणे म्हणाले.