मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी खासदार संभाजी छत्रपती सर्व पक्षीय खासदारांसह राष्ट्रपतींना भेटणार

कोल्हापूर : पंतप्रधान मोदींकडून प्रतिसाद मिळत नसल्याने भाजप खासदार संभाजी छत्रपती सर्वपक्षीय खासदारांना घेऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना येत्या २ सप्टेंबर रोजी भेटणार आहेत. संभाजी छत्रपती यांनीच व्टिट करत ही माहिती दिली आहे. त्यामुळे या भेटीत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघण्यासाठी चर्चा होणार आहे.

राष्ट्रपती व केंद्र सरकारची भूमिका महत्वाची

The role of the President and the Central Government is important

राष्ट्रपतींना मराठा आरक्षणाविषयी समाजाच्या भावना समजाव्यात यासाठी भेट मागितली होती. त्यानुसार त्यांनी २ सप्टेंबर रोजी भेटीसाठी वेळ दिली आहे. यावेळी सर्व पक्षीय प्रत्येकी १ खासदार प्रतिनिधींने उपस्थित रहावे, यासाठी आज सर्व पक्षाचे अध्यक्ष व गटनेत्यांना पत्र पाठवली आहेत, असे खासदार संभाजी छत्रपती यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविताना राष्ट्रपती व केंद्र सरकार यांची देखील भूमिका महत्वाची असल्याने संभाजीराजेंनी राष्ट्रपतींना मराठा आरक्षण प्रश्नी मराठा समाजाच्या भावना समजावून सांगण्यासाठी वेळ मागितला होता. सोबत महाराष्ट्रातील खासदारांना देखील समवेत भेटीसाठी वेळ दिली जावे असे कळविले होते. आज त्यांनी प्रमुख राजकीय पक्ष, अध्यक्ष, लोकसभा व राज्यसभेतील पक्षीय गटनेते यांना पत्र पाठविले आहे.

५० टक्के आरक्षणाची मर्यादा

50 per cent reservation limit

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ५० टक्के आरक्षणाची मर्यादा उठवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागणार आहे. याबाबत सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींसमोर आपल्या भावना मांडणार आहे. यावेळी राष्ट्रपती त्यांना काय सल्ला देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

BJP MP Sambhaji Chhatrapati will meet President Ram Nath Kovind on September 2 with all-party MPs as there is no response from PM Modi. Sambhaji Chhatrapati has given this information by visiting. Therefore, the visit will discuss a solution to the issue of the Maratha reservation.

Social Media