पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे ( NCP leader Eknath Khadse)यांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. लोणावळा आणि जळगाव येथील ही मालमत्ता असून ती 5 कोटी 73 लाख रुपयांची असल्याची माहिती आहे. पुण्यातील भोसरी(Bhosari ) इथली एम आय डी सी तील जमीन आपली पत्नी आणि जावयाच्या नांवे खरेदी केल्याप्रकरणी ही कारवाई झाल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजपा सरकारमध्ये मंत्री असताना खडसे यांनी हा व्यवहार केला होता , त्यानंतर त्यावर गदारोळ झाल्यावर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा ही दिला होता , या प्रकरणी राज्य सरकारने नेमलेल्या झोटिंग आयोगाच्या मार्फत झालेल्या चौकशीत खडसे यांना क्लीन चिट देण्यात आली होती मात्र सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ई डी ने याप्रकरणी चौकशी सुरू केल्यानंतर खडसे यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत असून त्यांच्या जावयाला अटकही करण्यात आली आहे आणि खडसे यांना दोन वेळा चौकशीसाठी ईडी समोर हजर व्हावे लागले आहे .
The ED has seized the property of NCP leader Eknath Khadse. The property is based in Lonavala and Jalgaon and is reportedly worth Rs 5.73 crore.
The action is said to have been taken for purchasing the MIDC land at Bhosari in Pune in the names of his wife and son-in-law.