‘सुप्त क्षयरोग’ प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी मनपा राबविणार विशेष प्रकल्प

मुंबई : लोकसंख्येची घनता लक्षात घेता मुंबई हे भारतातील सर्वांत मोठे व दाट लोकवस्तीचे शहर आहे. त्यामुळेच मुंबईसारख्या शहरात क्षयरोग प्रसारास प्रतिबंध होण्यासाठी सर्वस्तरीय प्रयत्न करणे आणि विविध स्तरीय उपाययोजना व्यापकपणे व प्रभावीपणे राबविणे अत्यंत गरजेचे आहे. याच उद्देशाने महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने सुप्त क्षयरोग संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी एक विशेष प्रकल्प हाती घेतला आहे.

या प्रकल्पांतर्गत महापालिका क्षेत्रातील क्षयरोग रुग्णांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तिंची मोहीम स्वरुपात चाचणी करण्यात येणार आहे. यामुळे क्षयरोग प्रसारास प्रतिबंध होण्यासह ‘सन – २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त भारत’ करण्याच्या भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी ध्येयाकडे जाण्यासही मोलाची मदत होणार आहे. *या अनुषंगाने सुप्त क्षयरोग संसर्गाचे मापन व विश्लेषण करणा-या प्रकल्पाची नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महापालिका क्षेत्रात या प्रकारचा प्रकल्प पहिल्यांदाच राबविला जात आहे.

सुप्त क्षयरोग –

Latent TUBERCULOSIs

सुप्त क्षयरोगाची बाधा झालेल्या व्यक्तिंच्या शरीरात क्षयरोगाचे जंतू सुप्तावस्थेत असतात. तसेच अशी बाधा झालेल्या व्यक्तिंमध्ये क्षयरोगाची सामान्यपणे आढळून येणारी लक्षणे नसतात. तथापि, सुप्त क्षयरोगाने बाधित असलेल्या व्यक्तिमध्ये भविष्यात ‘सक्रीय क्षयरोग’ उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे सुप्त क्षयरोगाचे वेळीच निदान होऊन त्यावर वेळच्यावेळी योग्य ते उपचार केल्यास संबंधीत व्यक्तिस भविष्यात सक्रीय क्षयरोग होण्यापासून प्रतिबंध होऊ शकतो. त्यामुळेच सुप्त क्षयरोगाचे मापन व विश्लेषण करणारा हा प्रकल्प मुंबईच्या सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

आयजीआरए चाचणी – सामान्यपणे क्षयरोग विषयक वैद्यकीय चाचण्यांमध्ये सुप्त क्षयरोगाचे निदान होत नाही. त्यामुळे सुप्त क्षयरोगाच्या संसर्गाचे निदान करण्यासाठी आयजीआरए चाचणी करावी लागते. या अंतर्गत संबंधीत व्यक्तिंच्या रक्ताचे नमुने घेऊन ही चाचणी केली जाते. या चाचणीचा अहवाल सामान्यपणे चाचणी केल्यापासून २४ तासांमध्ये मिळतो.

Considering the density of population, Mumbai is the largest and most densely populated city in India. That is why it is very important to make all-out efforts and implement various levels of measures comprehensively and effectively to prevent the spread of TB in a city like Mumbai. For this purpose, the Public Health Department of the BMC has undertaken a special project to prevent latent TB infection.

Social Media