केरळमध्ये निपाह विषाणूमुळे एका मुलाचा मृत्यू, ‘फक्त खबरदारी घेणेच आपल्या हातात…’

नवी दिल्ली : निपाह विषाणूच्या (Nipah virus)विळख्यात सापडलेल्या 12 वर्षांच्या मुलाचा केरळमध्ये मृत्यू झाला आहे. केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज(Kerala Health Minister Veena George) यांनी ही माहिती दिली आहे. या मुलाच्या रक्ताचा नमुना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी(National Institute of Virology), पुणे येथे पाठवण्यात आला होता, त्यानंतर त्यात निपाह विषाणूची पुष्टी झाली. यानंतर, नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलची एक टीम केंद्राच्या दिशेने रवाना झाली आहे.

दरम्यान, हा विषाणू काय आहे आणि तो कसा पसरतो हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. यावेळी केरळ कोरोना महामारीच्या रोषाला सामोरे जात आहे. कोरोना संसर्गाची सर्वाधिक प्रकरणे केरळमधूनही येत आहेत. अशा परिस्थितीत, निपाह विषाणू(Nipah virus) याठिकाणी आढळणे धोकादायक लक्षण असू शकते. हे अगदी कोरोना विषाणूसारखेच आहे.

निपाह व्हायरस (Nipah virus) हा एक नवीन प्रकारचा विषाणू आहे जो प्राण्यांपासून मानवांमध्ये खूप वेगाने पसरतो. हा विषाणूजन्य संसर्ग आहे. याचे परिणाम खूप गंभीर असू शकतात. दुर्दैवाने, आमच्याकडे या क्षणी प्रभावी उपचार नाही. जगभरातील शास्त्रज्ञ त्याची लस आणि औषध बनवण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत.

हा विषाणू सर्वप्रथम मलेशियातील कॅम्पुंग सुंगई निफा परिसरात आढळला. यानंतर, त्याची प्रकरणे बांगलादेश आणि भारतातही नोंदवली गेली. या विषाणूला निप्स असेही म्हणतात.

 कसा पसरतो ‘निपाह’ विषाणू

 How this virus spreads

निपाह विषाणू संक्रमित वटवाघुळ आणि डुकरांच्या संपर्कातून पसरतो. जेव्हा एखादी संक्रमित व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येते तेव्हा हा विषाणू पसरतो. मलेशियात त्याच्या घटनेचे कारण डुकरे होते. तर सिंगापूरमध्ये ते वटवाघळांमुळे पसरले होते. भारत आणि बांगलादेशमध्येही निपाह विषाणू पसरण्याचे हेच कारण आहे. जर या विषाणूबाधित कोणतेही फळ वटवाघुळांनी खाल्ले तर हा विषाणू त्या फळाद्वारे मानवांपर्यंत पोहोचतो.

‘निपाह’ विषाणूची लक्षणे

Symptoms of ‘Nipah’ virus

या विषाणूने संक्रमित व्यक्तीला ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, घसा खवखवणे आणि उलट्या होणे, चक्कर येणे, अॅटिपिकल न्यूमोनिया आहे.

काय खबरदारी घ्यावी

What precautions to take

  • अद्याप  या विषाणूचा उपचार  सापडलेला नाही, म्हणून सावधगिरी हाच एकमेव इलाज आहे.
  • फळे खरेदी करताना आणि खाताना काळजी घ्या.
  • वटवाघुळ आणि डुकरांशी संपर्क टाळा.
  • संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येणे टाळा.
  • लोकांमध्ये याची जास्तीत जास्त माहिती पसरवून जागृती करा.
  • तोंडावर मास्क लावा आणि साबणाने किंवा सॅनिटायझरने काही वेळानंतर हात स्वच्छ करत राहा.
  • लक्षणे दिसल्यास, रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात घेऊन जा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

A 12-year-old boy who was caught in the grip of nipah virus has died in Kerala. This was disclosed by Kerala health minister Veena George. The boy’s blood sample was sent to the National Institute of Virology, Pune, after which the Nipah virus was confirmed. After this, a team of National Centre for Disease Control has left for the Centre.

Social Media