मुंबई : हाडे आणि स्नायूंचे(Bones and muscles) वेदनादायी दुखणे चिकनगुनियाच्या रुग्णांना संपूर्ण वेळ जाणवते. एवढेच काय, त्यापैकी काहींच्या तर एक वर्षानंतरही या स्थितीतून बरे न होण्याच्या भयानक कथा आहेत. याचे सर्वात मोठे कारण काय माहितीये तुम्हाला, आपल्या आहाराकडे दुर्लक्ष…नक्कीच, तुम्हाला तुमचे आवडते जेवणही खावेसे वाटत नाही, कारण तुम्हाला खूप आजारी असल्यासारखे वाटते. पण लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या प्रतिकारशक्तीची काळजी ही घेतलीच पाहिजे. चिकनगुनिया हा एक प्रकारचा आजार आहे जो संक्रमित डासांच्या चावल्यामुळे मानवी शरीरात प्रवेश करतो. संक्रमित डास दोन प्रकारचे असू शकतात – एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस(Edis Egypti and Edis Albopictus). हा आजार दरवर्षी भारतातील प्रचंड लोकसंख्येवर परिणाम करतो.
चिकनगुनियाची लक्षणे(Chikungunya Symptoms)
- ताप
- सांधे दुखी
- पुरळ
- स्नायू दुखणे
- सांध्याभोवती सूज
- थकवा
- डोकेदुखी
- ळमळ इत्यादी..
डास चावल्यानंतर दोन ते सहा दिवसांनी ही लक्षणे दिसतात. परंतु यावर केवळ औषधेच मदत करणार नाहीत, कारण त्यांना कार्य करण्यासाठी, आपल्याला काही पोषक तत्त्वे आवश्यक आहेत जी केवळ हेल्दी डायट देऊ शकतात.
चिकनगुनियाग्रस्त लोकांसाठी हे दहा पदार्थ उपयुक्त
1. नारळ पाणी(Coconut Water)
“नारळाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते, जर एखाद्याला चिकनगुनिया ताप आला असेल. तर शहाळ्याचं पाणी ताजेतवाने आणि शरीरातील हायड्रेशन पातळी संतुलित राखण्यास मदत करते.. एखादी व्यक्ती दररोज दोन ते तीन वेळा शहाळ्याचे सेवन करू शकते, कारण शरीरातून विष बाहेर टाकण्यास मदत करते, ”
2. हिरव्या पालेभाज्या(Green leafy vegetables)
हिरव्या पालेभाज्या कोणत्याही आहारात जोडण्यासाठी आरोग्यदायी पर्याय आहेत. असंख्य पोषक तत्वांनी भरलेल्या, हिरव्या पालेभाज्या चिकनगुनिया दरम्यान सांधेदुखीसारख्या लक्षणांवर नियंत्रण ठेवून आणि आजाराचा सामना करण्यासाठी मदत करतात. व्हिटॅमिन ए मध्ये कॅलरीज कमी असतात त्यामुळं ते पचायला सोपे असतात.
3. सूप(soup)
“चिकनगुनिया हा आजार झालेल्या व्यक्तीला घरी बनवलेले ताज्या भाजीचे सूप soup(घेणे उत्तम. गाजर सूप, जे व्हिटॅमिन ए ने समृद्ध आहे, आणि टोमॅटो सूप, जे व्हिटॅमिन सी ने समृध्द आहे, सर्वोत्तम आहेत कारण ते आजारातून लवकर बरे होण्यास मदत करतात. ब्रोकोलिसमध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे ते चांगले असतात. हे सूप पोषक तत्वांनी भरलेले असतात, जे चिकनगुनियाच्या लक्षणांपासून मुक्त होण्यास मदत करतात, ”.
4. पपईच्या पानांचा अर्क(papaya leaf extract)
चिकनगुनियाच्या रुग्णांसाठी हा राम-बाण उपाय आहे. रक्तातील प्लेटलेट्सच्या संख्येत झपाट्याने घट होत असल्याने पपईच्या पानांचे अर्क अत्यंत फायदेशीर आहे. पपईच्या पानांचे सेवन केल्याच्या 3 तासांच्या आत प्लेटलेट्सची संख्या सुधारण्यासाठी अत्यंत प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.
5. औषधी वनस्पती(herbs)
“तुळशीच्या पानांसारखी प्रभावी औषधी चघळल्याने ताप कमी होण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. बडीशेप, अजवाइन, जिरे, गूळ आणि लिंबाचा रस टाकून बनवलेला हर्बल चहा स्नायू आणि सांधेदुखी दूर करण्यास मदत करतो, ”.
6. व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले पदार्थ(Foods rich in vitamin C)
व्हिटॅमिन सी ने समृध्द असलेले पदार्थ चिकनगुनिया दरम्यान खाण्याचा सल्ला दिला जातो, कारण ते रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. चिकनगुनियामुळे, पचनसंस्थेवरही परिणाम होतो त्यामुळे, संत्रा, किवी आणि पेरू सारखे व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले पदार्थ सहज पचवता येतात.
7. गिलोय रस(giloy juice)
चिकनगुनियाचा सामना करण्यासाठी गिलोयचा रस(giloy juice) खूप प्रभावी आहे. पाण्यात काही थेंब टाकून दिवसातून दोनदा याचे सेवन करता येते. लक्षात ठेवा की ते जास्त वापरू नये. गिलोयचा अर्क उतरवण्यासाठी तुम्ही पाण्यात उकळू देखील शकता.
8. बार्ली(barley)
जर तुम्हाला चिकनगुनियाचा त्रास होत असेल तर बार्ली (सत्तू) तुमच्या आहाराचा एक भाग बनवला पाहिजे. जे यकृताला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करते.
9. फळे(fruits)
चिकनगुनियाचा त्रास होत असताना मौसंबी, केळी, पपई, सफरचंद, नाशपाती इत्यादी फळे घेणे चांगले. ते अनेक पोषक तत्वांनी भरलेले असतात आणि लक्षणे नियंत्रित करण्यात मदत करतात.
10. लापशी(slapy)
लापशी हलकी आणि हेल्दी आहे. हे रुग्णाला चिकनगुनियापासून लवकर बरे होण्यास मदत करेल. कारण ते भरपूर पोषक तत्वांनी भरलेले असते.
चिकनगुनियाने ग्रस्त असलेल्या रुग्णांनी खालील पदार्थ टाळावेत
Patients suffering from chikungunya should avoid the following foods
1. मिठाई/गोड पदार्थ(Sweets) : चिकनगुनिया तापाच्या वेळी आपल्या तोंडाची चव बदलण्यासाठी थोडी साखर (Sweets)खाणे ठीक आहे, परंतु मिठाई म्हणा, किंवा अतिगोड पदार्थ जास्त खाऊ नका, कारण ती रोग प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी अडथळा बनण्याचे काम करू शकतात.
2. तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळा(Avoid oily and spicy foods): तुम्ही तुमच्या अन्नात तूप किंवा खोबरेल तेल घालू शकता, पण इतर तेल चिकनगुनियापासून बरे होण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणू शकतात. चिकनगुनिया पचनसंस्थेला त्रास देत असल्याने, तेल आणि मसाल्यांचा वापर कमी करणे किंवा टाळणे महत्वाचे आहे ज्यामुळे पचन प्रक्रियेला अधिक त्रास होणार नाही…
3. रस्त्यावरील पदार्थ किंवा जंक फूड(Street foods or junk food) : बाहेरचे अन्नपदार्थ पाचन तंत्रावर भार वाढवतात, विशेषत: ते मसाल्यांनी भरलेले असल्याने पोटाच्या संसर्गाची शक्यता वाढू शकते आणि इतर धोके देखील होऊ शकतात. त्यामुळे रुग्णाने बाहेरचे अन्न पूर्णपणे टाळावे.
४. शाकाहारी आहार घ्या(Vegetarian Diet) : डॉक्टर चिकनगुनियाच्या रुग्णांना मांसाहार टाळण्याचा सल्ला देतात, कारण त्यांचा यकृतावरील भार वाढतो. शाकाहारी खाद्यपदार्थांकडे वळणे ही एक चांगली आणि आरोग्यदायी निवड आहे.
म्हणून, जर तुम्हाला किंवा तुमच्या आजूबाजूच्या कोणालाही चिकनगुनियाचा त्रास होत असेल, तर या गोष्टींची माहिती आणि आत्मसात करणे महत्वाचे आहे..