पोस्को गुन्हयातील आरोपीला दोन वर्षाची कठोर कारावासाची शिक्षा

मुंबई : एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी विशेष पोस्को(POSCO) न्यायालयाने आरोपीला दोन वर्षे कठोर कारावासाची शिक्षा आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास आणखी एक महिना कठोर कारावासाची शिक्षा तसेच अपील कालावधी पुर्ण झाल्यावर दंडाच्या रकमेपैकी ४ हजार रुपये बळीत मुलीला नुकसान भरपाई देण्यात द्यावी, असेही न्यायालयाने या आदेशात म्हटले आहे.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Molestation of a minor girl

२५ नोव्हेंबर २०१९ रोजी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास आरोपी जमील शकुर शेख ( ३१) याने कॉलेजला जाणारी एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार पीडित मुलीने पायधुनी पोलीस ठाण्यात केली होती. या प्रकरणी पीडित मुलीचा सविस्तर जबाब नोंद करुन पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता.

पोस्को न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

Chargesheet filed in POSCO court

गुन्हयाच्या तपासादरम्यान आरोपी जमील शकुर शेख रा .मोहमंद अली रोड, सेट्रल हॉटेल जवळील फुटपाथ मुंबई यास अटक करण्यात आली . त्याच्या विरोधात विशेष पोस्को न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते . या गुन्हयाची सुनावणी श्रीमती भारती काळे , कोर्ट क्र .१८ , विशेष पोस्को न्यायालय , सेशन कोर्ट यांच्या खंडपीठासमक्ष सुरू होती . गुरुवारी न्यायालयाने या खटल्यातील आरोपी जमील शकुर शेख यास पोक्सो कायदा कलम १२ व भारतीय दंडविधान संहिता कलम ३५४ ( ड ) अंतर्गत दोषी ठरवले.

न्यायालयाने त्याला दोन वर्षे कठोर कारावासाची शिक्षा आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास आणखी एक महिना कठोर कारावासाची शिक्षा तसेच अपील कालावधी पुर्ण झाल्यावर दंडाच्या रकमेपैकी ४ हजार रुपये बळीत मुलीला नुकसान भरपाई देण्यात द्यावी, असेही न्यायालयाने या आदेशात म्हटले आहे. या प्रकरणात विशेष सरकारी अभियोक्ता म्हणुन श्रीमती सुलभा जोशी यांनी काम पाहिले.

A special POSCO court has sentenced the accused to two years of rigorous imprisonment and a fine of Rs 5,000 for molesting a 16-year-old minor girl. The court also said that if the fine is not paid, the girl should be given compensation for another month’s rigorous imprisonment and rs 4,000 out of the fine amount on completion of the appeal period.


महिलांवरील अत्याचाराबाबत सरकार असंवेदनशील  –

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी एससी, एसटी अ‍ॅट्रॉसिटी कायद्या सारखा कायदा करा :  चित्रा वाघ 

Social Media