ज्ञानेश्वरी जयंती…

आज २७ सप्टेंबर भाद्रपद वद्य षष्ठी. हा दिवस ज्ञानेश्वरी जयंती(Dnyaneshwari Jayanti) म्हणून साजरा केला जातो. वास्तविक ज्ञानेश्वरी ग्रंथ (Dnyaneshwari Granth)नेमका कोणत्या दिवशी पूर्णत्वास गेला ती तिथी अज्ञात आहे. परंतु एकनाथांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार करण्याचे काम या दिवशी पूर्ण केले. म्हणून हा दिवस ज्ञानेश्वरी जयंती म्हणून साजरा करतात.

नाथांचे त्यांच्या जीवनातील महत्वाचे कार्य म्हणजे ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार करणे. एके दिवशी त्यांचा घसा दुखू लागला. त्यावर औषधोपचार झाले. पण गुण येईना. तिसर्‍या दिवशी ज्ञानदेव त्यांच्या स्वप्नात आले. त्यांना म्हणाले, ‘माझ्या मानेस अजानवृक्षाच्या मुळीचा गळफास बसला आहे. तो तू स्वत: येथे येऊन काढ. म्हणजे तुझा घसा बरा होईल. म्हणून समुदाय बरोबर घेऊन कीर्तन करीत नाथ शके १५०५ मधे आळंदीस आले. याविषयी नाथांचा अभंग प्रसिद्ध आहे.

श्रीज्ञानदेवें येऊनी स्वप्नात ।
सांगितली मात मजलागी ॥१॥

दिव्य तेज:पुंज मदनाचा पुतळा ।
परब्रह्म केवळ बोलतसे ॥२॥

अजानवृक्षाची मुळी कंठास लागली ।
येऊनी आळंदी काढी वेगे ॥३॥

ऐसें स्वप्न होता आलो अलंकापुरी ।
तंव नदी माझारी देखिले द्वार ॥४॥

एका जनार्दनी पूर्वपुण्य फळले ।
श्रीगुरु भेटले ज्ञानेश्वर ॥५॥

स्वप्नातील दृष्टांतानुसार नाथ आळंदीस आले. आळंदीस (Alandi)सिद्धेश्वराचे स्थान प्राचीन होते. (Alandis Siddheshwara’s place was ancient)ते स्थान गर्द झाडीने वेढलेले होते. बरोबरच्या मंडळींना बाहेर बसवून नाथ समाधिस्थानाच्या शोधार्थ निघाले. दूरूनच त्यांना अजानवृक्ष दिसला. समाधीचे दार उघडून ते आत शिरले. तेथे त्यांना वज्रासन घालून बसलेले ज्ञानराज दिसले. त्यांचे दर्शन होताच एकनाथांनी त्यांच्या पायी दंडवत घातले. तीन अहोरात्र त्यांना ज्ञानराजांचा सहवास लाभला असे केशवांनी नाथचरित्रात लिहीले आहे. अजानवृक्षाची मुळी मस्तकाला लागल्याचे निमित्त करून ज्ञानदेवांनी नाथांना प्रत्यक्ष दर्शन दिले व ज्ञानेश्वरीचा लोकात प्रसार करण्यची आज्ञा केली. नाथ समाधीच्या बाहेर आल्यावर लोकांनी पूर्ववत समाधीस्थानावर दगड रचून टाकले.

पैठणला परतल्यावर नाथांनी ज्ञानेश्वरीच्या संशोधनाचे कार्य हाती घेतले. लोकांच्या व पाठकांच्या चुकीमुळे काही अशुद्ध व अबद्ध पाठ त्यात घुसडले गेलेले होते. ते त्यांनी काढून टाकले व ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत वाचकांच्या हाती दिली. नाथांना ज्ञानदेवांचे दर्शन शके १५०५ मधे ज्येष्ठात झाले व ज्ञानेश्वरी संशोधनाचे काम शके १५०६ मधे तारण नाम संवत्सरी संपले. ज्ञानेश्वरीच्या शेवटी त्यांनी हा ज्ञानेश्वरी शु्द्धिकरणाचा काळ नोंदवला आहे. तो ग्रंथ मूळचा अतिशय शुद्ध असून लोकांच्या पाठभेदामुळे अशुद्ध झाला होता तो संशोधित करून आपण ही प्रत तयार केली आहे असे त्यांनी सांगितले आहे.

आज आपण वाचतो ती एकनाथांनी तयार केलेली ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत. भाद्रपद वद्य षष्ठीला हे काम पूर्ण झाले. म्हणून तो दिवस ज्ञानेश्वरी जयंती म्हणून मानण्यात येतो.

Nath’s important work in his life is to create a pure copy of Dnyaneshwari. One day his throat started hurting. He was treated for medicine. But the qualities did not come. On the third day, Gyandev came to his dream. He said to them, ‘My neck is hanging from the ajan tree. You come here yourself and remove it. So your throat will be fine. So Nath Shake came to Alandis in 1505, performing kirtan with the community. Nath’s abhang is famous for this.


आजही तेच प्रश्न… तु माझा धागा का झाली नाहीस ? –

पितृपक्ष — एक संवाद !

Social Media