मुंबई : आरोग्य विभागाच्या पद भरतीसाठी ऐनवेळी रद्द झालेल्या परिक्षांबाबत आज प्रदिर्घ बैठकीनंतर २४ ऑक्टोबरला गट क ची परीक्षा तर गट ड साठी ३१ ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मागील शनिवारी आरोग्य विभागाच्या भरती परीक्षा पुढे ढकलल्यानंतर राज्यभरातून विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला होता.
चुकीचे काही दिसेल तर तक्रार दाखल करा(File a complaint if you see anything wrong)
राजेश टोपे यांनी माहिती दिली की, ९ दिवस आधी प्रवेश पत्रिका (हॉलतिकीट) दिले जाईल. विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका मोठ्या स्वरुपाची परीक्षा होत असेल तर अशा वावड्या उठतात. त्यावर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. कुणीही काहीही चुकीच्या गैर मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला तर संबंधित विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पोलीस स्टेशनला तक्रार करावी. परीक्षा पारदर्शक व्हाव्यात असे आवाहन राजेश टोपे यांनी केले. अफवांवर विश्वास ठेऊ नका, चुकीचे काही दिसत असेल तर तक्रार दाखल करा, असे राजेश टोपे म्हणाले.
दोन्ही दिवशी रविवार असल्याने शाळा उपलब्ध(Schools available as both days are Sunday)
नव्या तारखांच्या या दोन्ही दिवशी रविवार असल्याने शाळा उपलब्ध होतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. परीक्षेच्या तयारीसाठी डॅशबोर्ड द्यावा, परीक्षा केंद्रांची माहिती, उपलब्ध शाळांची माहिती १ ऑक्टोबरपर्यंत द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
६२०५ पदांच्या सरळ सेवाभरतीसाठी परीक्षा (Examination for direct recruitment of 6205 posts )
दरम्यान, आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील २७३९ आणि गट ड संवर्गातील ३४६६अशा एकूण ६२०५ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी राज्यातील १५०० केंद्रावर एकाच वेळी परीक्षा घेतली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया शासनाने निवडलेल्या खासगी बाह्य स्त्रोतांमार्फत केली जात आहे. उत्तर पत्रिकांची तपासणी संगणक प्रणालीद्वारे केली जाणार आहे.
State health minister Rajesh Tope said that after a first meeting today on the timely cancellation of examinations for recruitment to the post of the health department, it has been decided to conduct the group C exam on October 24 and group D on October 31. Students from across the state had expressed widespread anger after the health department postponed its recruitment exam last Saturday.
कोरोनासोबतच वाढली डेंग्यूची भीती –
कोरोनासोबतच वाढली डेंग्यूची भीती, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या विविध भागात डेंग्यूचे थैमान