मुंबई : सोमवारी राज्यातील सत्ताधारी पक्षांकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद दरम्यान बेस्टच्या ८ बसेसची तोडफोड करण्यात आली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून बसची तोडफोड करणाऱ्या लोकांना शोधून त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करावी. तसेच दिवसभर बसेस बंद राहिल्याने बेस्टचे सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हे सर्व नुकसान राज्य सरकारने भरून द्यावे, अशी मागणी बेस्ट समितीचे भाजप सदस्य सुनिल गणाचार्य यांनी केली.
बंदमध्ये बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बेस्ट कामगार सेनेने केले होते. या दरम्यान बेस्टच्या बसेस डेपो बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात असतानाच ८ बसगाड्या आणि भाडेतत्वावरील एका बसची तोडफोड करण्यात आली आहे. धारावी, मानखुर्द, शिवाजी नगर, चारकोप, ओशिवरा, देवनार, इनॉर्बिट मॉल, अशा विविध भागात या तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत.
बेस्ट तोट्यात आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदमध्ये बेस्टचा महसूल बुडाला, शिवाय तोडफोडीत नुकसान झाले आहे. मुंबईत बहुतेक ठिकाणी सीसीटीव्ही आहेत. त्या माध्यमातून बसवर दगडफेक करणाऱ्या लोकांचा सरकारने आणि पोलिसांनी शोध घ्यावा. त्यांना पकडून नुकसान भरपाई वसूल करावी. तसेच बेस्ट उपक्रमाला तिकीट विक्रीमधून दिवसाला मिळणाऱ्या सुमारे सव्वा दोन कोटींचे उत्पन्न बुडाले आहे. यामुळे ही सर्व नुकसान भरपाई बंदची हाक देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने आणि सरकारमध्ये सहभागी असलेल्या राजकीय पक्षांनी भरून द्यावी, असेही गणाचार्य म्हटले.
Eight BEST buses were vandalized during the Maharashtra bandh called by the ruling parties in the state. People who vandalize buses through CCTV should be traced and compensation should be recovered from them. BEST has also suffered a loss of around Rs 2.25 crore as buses remained closed throughout the day. BJP member of the BEST committee Sunil Ganacharya demanded that the state government compensate for all these losses.