अनिल देशमुखांवर आता CBI च्या धाडी

नागपूर : बेहिशेबी मालमत्ता आणि भ्रष्टाचार च्या प्रकरणात पुन्हा CBI ने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरावर आज सकाळी धाड टाकली, सकाळी 8 च्या दरम्यान 6 अधिकाऱ्यांचे पथक कोणतीही पूर्वसूचना न देता अनिल देशमुख यांच्या घरी गेले मात्र अनिल देशमुख यावेळी गैरहजर होते.

अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख, पत्नी आणि इतर कुटुंब यावेळी घरीच होते . तब्बल 8 तास CBI च्या अधिकाऱ्यांनी देशमुख कुटुंबाची चौकशी करीत काही महत्त्वाचे दस्तावेज पडताळून बघितले. CBI च्या अधिकाऱ्यांनी घरून निघतांना हे दस्तावेज जप्त करीत सोबत घेऊन गेले. दरम्यान या कार्यवाही ला विरोध करण्यासाठी नागपुरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अनिल देशमुख यांच्या घरासमोर एकत्र येत CBI, ED च्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता . घोषणाबाजी करणाऱ्या राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत काही वेळानंतर सोडून देण्यात आले . CBI चे पथक दुपारी 4 च्या दरम्यान अनिल देशमुख यांच्या घरून रवाना झाले.

In the case of unaccounted property and corruption, CBI again raided former state home minister Anil Deshmukh’s Nagpur house this morning, around 8 am a team of six officers went to Anil Deshmukh’s house without any prior notice but Anil Deshmukh was absent on the occasion.

Social Media