एनसीबीचे पथक शाहरुख खानच्या मन्नतवर

मुंबई : ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर गुरुवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे एक पथकाने थेट शाहरुखच्या घरी पोहोचले. शाहरुखच्या घरावर एनसीबीनं छापा टाकल्याची चर्चा मीडियात सुरू झाली. मात्र, एनसीबीनं ही चर्चा फेटाळून लावली आहे.

‘आर्यन खानशी संबंधित काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी एनसीबीचे अधिकारी शाहरुखच्या ‘मन्नत’ या निवासस्थानी गेले होते. तिथं कुठल्याही प्रकारचा छापा टाकण्यात आलेला नाही,’ असं एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी म्हटले आहे.

शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यातच त्याचं कार्यालय आहे. तपास अधिकारी व्ही. व्ही. सिंह यांच्या नेतृत्वाखालील टीमनं तिथं जाऊन शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी हिला नोटीस बजावली. एनसीबीनं पूजा ददलानी हिच्याकडं आर्यनची शैक्षणिक व वैद्यकीय माहिती मागवल्याचं समजतं. आर्यनकडे दुसरा मोबाइल किंवा इतर कुठलीही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असल्यास ती आमच्याकडं सोपवावी, अशी मागणी एनसीबीनं शाहरुखकडं केल्याचं सूत्रांकडून समजतं. अर्थात, हा छापा नव्हता असं एनसीबीनं स्पष्ट केलं आहे.

A team from narcotics control bureau reached Shah Rukh’s house directly on Thursday after arresting actor Shah Rukh Khan’s son Aryan Khan in a drugs case. There was talk in the media that Shah Rukh’s house was raided by the NCB. However, the NCB has rejected the discussion.

Social Media