भारतीय विशिष्ट ओळख पत्र प्राधिकरण UIDAI ‘आधार हॅकेथॉन-2021’ करणार आयोजित

नवी दिल्ली : “आझादी का अमृत महोत्सव” साजरा करण्यासाठी आणि भारतीय युवावर्गातील  नाविन्यपूर्ण संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी, भारतीय विशिष्ट ओळख पत्र प्राधिकरण (UIDAI) दिनांक  28 ऑक्टोबर 2021 ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत ‘आधार हॅकेथॉन 2021’ आयोजित करत आहे.

या उपक्रमाला अत्यंत उत्साहात प्रतिसाद मिळत आहे; आतापर्यंत 2700 अधिक नोंदण्या पूर्ण झाल्या आहेत

भारतीय विशिष्ट ओळखपत्र प्राधिकरणाने (UDAI) रहिवाशांना चांगला  अनुभव देण्यासाठी आणि तांत्रिक नवकल्पनांच्या माध्यमातून नावनोंदणी आणि प्रमाणीकरण सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्मशी संवाद साधण्यासाठी ‘आधार हॅकेथॉन-2021’ सुरू केली आहे.  या हॅकेथॉनमध्ये नावनोंदणी आणि प्रमाणीकरण या दोन व्यापक संकल्पनांच्या अंतर्गत वर्गीकृत केलेल्या एकापेक्षा अधिक समस्यांचे निराकरण करणाऱ्या विधानांचा (सोयींचा)समावेश आहे.  आतापर्यंत, या संदर्भात यूडाईकडे  गेल्या काही दिवसांतच अभियांत्रिकी विद्यार्थ्यांकडून 2700 पेक्षा  अधिक नोंदण्या प्राप्त झाल्या आहेत, ज्यातून  रहिवाशांना भेडसावणारी  वास्तविक जीवनातील आव्हाने, स्वतःहूनच सोडवण्याचा या  तरुण मनांचा कल स्पष्ट दिसून येतो.

या तरुण नवोदित युवावर्गाला मदत करण्यासाठी,  यूडाई समूहाद्वारे (UIDAI) दैनंदिन ऑनलाइन संवाद सत्रे देखील आयोजित केली जात आहेत, ज्यायोगे त्यांचा योग्य वापर करण्यासह समस्या आणि संकल्पना स्पष्ट केल्या जात आहेत.  या परस्परसंवादी चर्चासत्रांना अनेक युवा  नवोदितांनी/सहभागधारकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला आणि त्याची प्रशंसा केली.

यूडाईद्वारे माहिती तंत्रज्ञान उद्योग, शैक्षणिक क्षेत्रातील सल्लागार आणि सरकारमधील वरिष्ठ सदस्य/अधिकारी यांचा समावेश असलेल्या परीक्षकांच्या मदतीने नव्या दृष्टिकोनावर आधारित सादरीकरणाचे मूल्यमापनही या उपक्रमाअंतर्गत  नियोजित केले  आहे.

‘आधार हॅकेथॉन 2021’चे तपशील https://hackathon.uidai.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

To celebrate the “Azadi Ka Amrit Mahotsav” and to promote a culture of innovation among Indian Youth, UIDAI is conducting ‘Aadhaar Hackathon 2021’ from 28th October 2021 to 31st October 2021.

Prime Minister Narendra Modi had said that “Innovation is not merely a word or an event. It’s an ongoing process. You can innovate only when you understand a problem and try to find out its solution. We must go to the root of the problem and find out-of-the-box solutions. In the era where knowledge is power, innovation is the driver of growth.” On these guiding lines, UIDAI has initiated ‘Aadhaar Hackathon-2021’ to enhance the experience of the residents and the way they interface with enrolment and authentication software platforms through technological innovations. The hackathon consists of multiple problem statements categorized under two broad themes i.e. Enrolment and Authentication. So far, UIDAI has received more than 2700+ registrations from the Engineering Students in the last few days, which in itself explains the inclination of the young minds in solving real-life challenges being faced by the Residents. Participation includes Students from all categories of Engineering Institutes i.e. IITs, NITs, and NIRF and many top ranked colleges from all corners of the country – from eastern states like Arunachal Pradesh to J&K in the North.

Social Media