एसटी महामंडळाचे विलीनीकरण सरकारमध्ये करा

मुंबई : एसटी महामंडळाचे(ST corporation) राज्य सरकारमध्ये तातडीने विलीनीकरण करुन राज्यातील एसटीच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याची आग्रही मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर(Pravin Darekar) यांनी आज परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab)यांच्याकडे केली.

विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी आज परिवहन मंत्री परब यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घतेली. यावेळी एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने उपस्थित होते.यावेळी दरेकर यांनी एसटी कर्मचा-यांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी परिवहन मंत्री परब यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, अन्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे. एसटी कर्मचारी अत्यंत कठीण परिस्थितीत सेवा देत आहेत. आपल्या आरोग्याची व तब्येतीची पर्वा न करता प्रामाणिकपणे दिवसरात्र सेवा देत आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा विषय महाराष्ट्रभर सुरू आहे. विविध कर्मचारी यूनियन, कृती समित्या आणि काही ठिकाणी कर्मचारी राज्यभर या विषयाला न्याय मिळण्यासाठी आंदोलन करत आहेत. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांना सांगून व आपली प्रतिष्ठा पणाला लावून परिवहनमंत्री परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर केले, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. हा पगाराचा दिलासा कायम स्वरुपी राहावा अशी विनंतीही दरेकर यांनी परब यांना केली. दोन-तीन महिन्यांनी पुन्हा कर्मचा-यांचे पगार रखडल्याची परिस्थिती निर्माण होऊ नये, अशीही विनंतीही दरेकर यांनी केली. त्यामुळे परिवहन खात्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने प्रस्ताव तयार करुन अश्या प्रकारचा त्यांनी राज्य सरकारकडे पाठविण्याची मागणीही दरेकर यांनी यावेळी केली.

विलीनीकरणामुळे सरकारच्या तिजोरीवर आर्थिक बोजा येईल याचे मला भान आहे. तथापि राज्य सरकार ही प्रॉफिट मेकिंग संस्था नाही. आपण सेवा देणारी संस्था आहोत आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांकडे असणारे त्यांचे वजन परब यांनी वापरावे. विरोधी पक्ष म्हणून जे सहकार्य लागेल ते आपल्याला व राज्य सरकारला निश्चितपणे करू, असा विश्वासही दरेकर यांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशीही याविषयी चर्चा केली आहे. राज्य सरकारने या विषयावर विरोधकांना चर्चेसाठी बोलावले तर आम्ही निश्चितपणे सरकारला सहकार्य करू असे आश्वासनही दरेकर यांनी यावेळी त्यांना दिले.

सध्या एस.टी. कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपाच्या काळात त्यांच्यावर करण्यात येणारी प्रशासकीय कार्यवाही थांबविण्यात यावी त्याचप्रमाणे त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत. तसेच एस.टी. कर्मचा-यांच्या ज्या मागण्या मान्य झाल्या आहेत त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी. उदा. डी.ए. मध्ये झालेली वाढ ही लवकरात लवकर अमलात आणण्यात यावी व वेतन व इतर भत्ते वेळेवर देण्यात यावेत. अशी मागणीही दरेकर यांनी परिवहन मंत्री परब यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनात केली आहे.

Opposition leader of the Legislative Council Pravin Darekar today demanded transport minister Anil Parab to immediately merge the ST corporation with the state government and bring justice to st employees in the state.

Social Media