ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाडव्याच्या मुहूर्तावर ५ नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्र केदारनाथ (Kedarnath )येथे श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या समाधीचे व मूर्तीचे अनावरण होणार आहे. या वेळी पंतप्रधानांच्या हस्ते केदारनाथ धाम येथे झालेल्या २०० कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन, तर २०० कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजनही होणार आहे.
या कार्यक्रमानिमित्ताने आद्य शंकराचार्यांनी ज्या तीर्थक्षेत्रांना पदस्पर्श केला. तसेच १२ ज्योतिर्लिंग अशा देशभरातील ८२ तीर्थक्षेत्री भारतीय जनता पार्टीतर्फे देशव्यापी कार्यक्रम होणार आहेत. राज्यात या निमित्ताने त्र्यंबकेश्वर , घृष्णेश्वर , भीमाशंकर , परळी वैजनाथ , औंढा नागनाथ तसेच पंढरपूर , माहूर , कोल्हापूर , तुळजापूर येथे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील , केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे , डॉ. भागवत कराड , डॉ. भारती पवार आदी सहभागी होणार आहेत, अशी माहिती भाजपाचे आमदार व ठाणे शहर जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. या ठिकाणी भजन , नाम संकीर्तन , आरती , साधू महंतांचा सत्कार असे कार्यक्रम होणार आहेत.
राज्यात होणाऱ्या कार्यक्रमांची ठिकाणे आणि उपस्थित राहणारे मान्यवर याची माहिती अशी – त्र्यंबकेश्वर – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार , कपिल पाटील, खा. डॉ. प्रीतम मुंडे, घृष्णेश्वर – केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे , डॉ. भागवत कराड , विजयाताई रहाटकर, भीमाशंकर – माजी मंत्री संजय भेगडे, जगद्गुरू शंकराचार्य मठ कोल्हापूर – प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील , माहूर – खा. प्रताप पाटील चिखलीकर , व्यंकटराव गोजेगावकर , पंढरपूर – खा. जयसिद्धेश्वर महास्वामी, आ. समाधान अवताडे , आ. प्रशांत परिचारक , परळी वैजनाथ – राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, औंढा नागनाथ – आ. तान्हाजी मुटकुळे , गजानन घुगे, रेणुकादास देशमुख, तुळजापूर – आ. राणा जगजितसिंग पाटील, नितीन काळे. भाजपा प्रदेश अध्यात्मिक आघाडीचे संयोजक आचार्य तुषार भोसले हे या कार्यक्रमाचे संयोजक आहेत.
The Prime Minister, Shri Narendra Modi, will unveil the tomb and statue of Shrimad Adi Shankaracharya at Sri Kshetra Kedarnath on November 5 on the occasion of Padwa. The Prime Minister will inaugurate the Rs 200 crore development work at Kedarnath Dham and lay the foundation stone for development works worth Rs 200 crore.