मुंबई : एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना क्रुझ ड्रग्ज प्रकरणासह ६ प्रकरणांवरून हटवण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांची बदली आता दिल्लीला होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र समीर वानखेडे यांनी स्वत: प्रतिक्रिया देताना आपली बदली झाली नसल्याचे सांगितले आहे. “माझी बदली झाली नाही, मी अद्याप झोनल डायरेक्टर पदावर कायम आहे. बदलीच्या फक्त अफवा आहेत असे ते म्हणाले.
आर्यन खान, समीर खान प्रकरणांचा तपास संजय सिंहकडे(Sanjay Singh investigates Aryan Khan, Sameer Khan cases)
समीर वानखेडे पुढे बोलताना म्हणाले की, फक्त माझ्याकडील ६ प्रकरणे दिल्लीतील टिमकडे देण्यात आली. मी माझ्या याचिकेत म्हटले होते की या दोन प्रकरणांचा कोणत्याही केंद्रीय तपास यंत्रणेकडून तपास करावा. त्यात आर्यन खान, समीर खान यांच्या प्रकरणांचा तपास आयपीएस संजय सिंह यांच्या नेतृत्वात तपास होणार. तसेच त्यांनी ‘मी मुंबईतच झोनल डायरेक्टर म्हणून कायम आहे.’ असेही यावेळी वानखेडे यांनी सांगितले आहे. दरम्यान, आर्यन खान, समीर खान आणि इतर ४ प्रकरणाच्या तपासासाठी एनसीबी दिल्लीने एका विशेष पथकाची नियुक्ती केली आहे.
ही तर सुरूवात; मलिक यांचे ट्विट(This is the beginning; Malik’s tweet)
वानखेडे यांनी या प्रकरणात खंडणी वसूलीचा प्रयत्न केल्याचा असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. आता त्यांना या प्रकरणावरून हाटवण्यात आल्यानंतर मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, ‘आर्यन खान प्रकरणासह ५ प्रकरणांमधून समीर वानखेडे यांची हकालपट्टी झाली एकूण २६ प्रकरणे तपासण्याची गरज आहे. ही फक्त सुरुवात आहे… ही व्यवस्था स्वच्छ करण्यासाठी अजून बरेच काही करावे लागेल आणि आम्ही ते करू असेही ते पुढे म्हणाले.