मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या(Maharashtra Legislative Council) सहा जागांसाठी येत्या १० डिसेंबरला निवडणूक होणार आहे. तर १४ डिसेंबरला निकाल जाहीर होईल, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मुंबईतून शिवसेनेचे रामदास कदम यांना संधी दिली होती. मात्र, पक्षाविरोधात केलेल्या कार्यवाहीमुळे कदम यांचा पत्ता कापला जाण्याची शक्यता आहे.
विधानपरिषदेच्या एकूण आठ जागांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. सोलापूर आणि अहमदनगर वगळता मुंबईतील 2, कोल्हापूर, धुळे-नंदुरबार, अकोला-बुलडाणा-वाशिम, नागपूर या 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे. मुंबईतून शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम(Ramdas Kadam), भाई जगताप(Bhai Jagtap)विधान परिषदेवर गेले होते. त्यांची मुदत संपुष्टात आल्याने भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेचे पारडे जड आहे. तर भाजपचे नगरसेवक देखील 85 झाल्याने ही लढत चुरशीची होणार आहे.
शिवसेनेचे खंदे समर्थक म्हणून रामदास कदम यांची ओळख आहे. शिवसेनेची तोफ म्हणून कदम यांनी एकेकाळी किल्ला लढविली होती. विधानसभेच्या निवडणुकीत रामदास कदम(Ramdas Kadam) यांच्या मुलाला संधी देण्यात आली. तर महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर रामदास कदम यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते पक्षविरोधी कार्यवाही करतानाचे प्रकार उघडकीस आले. नुकतेच राम कदम यांनी आमदार अनिल परब यांच्या दापोलीतील बंगल्यासंदर्भातील भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya)यांना रसद पुरवल्याची माहिती आणि संभाषण क्लिप बाहेर आली होती. त्यानंतर कदम यांना मातोश्रीने बंदी घातली. त्यानंतर ठाण्यात शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न कदम यांनी केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी उघड नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात होते. त्यामुळे कदम यांना पत्ता कट होणार असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.
Elections to six seats of the Maharashtra legislative council will be held on December 10. The Central Election Commission has made it clear that the results will be declared on December 14. Meanwhile, Shiv Sena’s Ramdas Kadam was given a chance from Mumbai in the local bodies’ elections. However, Kadam’s address is likely to be cut off due to action taken against the party.