पंढरपूर : कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी चंद्रभागेच्या काठावर पंढरपुरात आज भाविकांनी गर्दी केली. एकादशीच्या सोहळ्याचा प्रारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या हस्ते सपत्नीक झालेल्या शासकीय महापूजेने झाली.
कार्तिकी एकादशीच्या(Kartikeya Ekadashi) शासकीय महापूजेस उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत नांदेड़ जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील निळा सोनखेड कोंडीबा व प्रयागबाई टोणगे हे 30 वर्षापासून वारी करणारे दांपत्य उपस्थित होते. यावेळी मंदिरे समितीच्या वतीने व राज्य शासनाच्या वतीने मनाच्या वारकर्याचा सन्मान करीत त्यांना एक वर्षासाठी मोफत एसटी पास देण्यात आला. प्रसंगी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मंदिरे समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर उपस्थित होते.
एकादशीच्या सोहळ्यासाठी रविवारी रात्रीपासूनच पंढरपुरात गर्दी होण्यास सुरूवात झाली. एसटी संपामुळे भाविकांची संख्या घटली. पण, रेल्वे आणि खाजगी वाहनातून येणारी गर्दी लक्षणीय होती. पहाटेपासूनच विठूनामाच्या गजराने अवघी पंढरी दुमदुमून गेली.
Devotees thronged Pandharpur on the banks of Chandrabhaga today for the Kartikeya Ekadashi celebrations. The Ekadashi ceremony began with a government mahapuja hosted by deputy chief minister Ajit Pawar.