नांदूरमधमेश्वर अभयारण्यात हजारांपेक्षा जास्त देशी-विदेशी पक्ष्यांचे आगमन

नाशिक : नांदूरमधमेश्वर(Nanduramdhameshwar) हे निफाड तालुक्यात असून नाशिक(Nashik) पासून पन्नास किलोमीटरवर अंतरावर आहे, नाशिक जिल्ह्यातील पक्षी पर्यटनाचे मुख्य पर्यटनाचे ठिकाण असून अनेक वेगवेगळ्या प्रजातीचे पक्षी आणि प्राणी या अभयारण्यात वास्तव्यास असतात,

या ठिकाणी सुमारे चार फूट उंची, उंच पाय, लांब चोच अन् पंखांना वरून सफेद तर खालून लाल रंग असणारा किंबहूना पर्यटकांचे खास आकर्षण असलेल्या फ्लेमिंगो Flamingo पक्षाचे नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात आगमन झाले असून धरणाच्या बॅक वॉटर असलेल्या चापडगाव जवळील टॉवर परिसरात फ्लेमिंगो (flamingo-birds)सह अनेक विदेशी पक्ष्यांचे वास्तव्य असून गुजरातमधील कच्छच्या रणातून हे पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करीत दरवर्षी या अभयारण्यात दाखल होत असतात. यंदा हे पक्ष एक-दीड महिना अगोदरच नांदूरमध्यमेश्वर येथे दाखल झाले आहे. पुढील काही दिवसात फ्लेमिंगोची दुर्मिळ पक्ष्यांची संख्या वाढण्याचा अंदाज पक्षीमित्रांनी वर्तवला आहे.

महाराष्ट्राच्या भरतपूर समजल्या जाणार्‍या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात (Nandurmadhyameshwar Bird Sanctuary)आता पक्ष्यांची संख्या वाढू लागली असून देश-विदेशातील पक्षी अभयारण्यात दाखल झाल्याने पक्ष्यांच्या किलबिलाटाने हा परिसर गजबजला आहे. फ्लेमिंगो हा पक्षी गुजरातमध्ये रोहित नावाने ओळखला जातो. तर आकाशात उडतांना लाल पंखामुळे अग्निच्या ज्वाळा पडताना दिसतात म्हणून या पक्ष्यास अग्निपंख असेही संबोधले जाते. लांब चोच व चोचीत असलेली चाळण, उंच व लाल रंगाचे पाय, सफेद मोठे पंख तर खालून लाल रंग असा हा पक्षी दुर्मिळच बघायला मिळतो,

येथील पाणथळ व दलदलीचा परिसर यामुळे भक्ष्य शोधणे सुलभ होत असल्याने शांत वातावरणात व दाट झाडी असल्याने देश-विदेशातील सुमारे 280 प्रकारचे पक्षी या ठिकाणी आपल्याला बघण्यास मिळतात, हा परिसर अनुकूल असल्याने दरवर्षी हिवाळ्यात हजारो किलोमीटरचाचा प्रवास करीत हे पक्षी या अभयारण्यात स्थलांतरीत होतात. तर मार्च महिन्यात पुन्हा परतीच्या प्रवासाला विदेशी पक्षी निघतात.

नांदूरमध्यमेश्वर धरण परिसरात बॅक वॉटर असलेल्या चापडगाव टॉवर परिसरात सध्या वेगवेगळ्या प्रजातीचे दुर्मिळ पक्षी वास्तव्य दिसत असून धरण परिसरात विहार करतांना तर कुठे भक्ष्य शोधतांना हे पक्षी दिसून येतात. सध्या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात देश-विदेशातील जवळपास 20 हजार पेक्षा जास्त पक्षी आढळून येत असून यात प्रामुख्याने मछली घार, खंड्या, नदीसूरय, कमळपक्षी, पिनटेल, गार्गनी, गढवाल, ऑस्प्रे, कॉमन क्रेन, नॉर्यन शॉवलर, मार्श हॅरियर, मॉन्टेग्यू, हॅरियर, ब्लू थ्रोड, गोल्डन फ्लॉवर, खंड्या, जांभळी पानकोंबडी, शेकाट्या, स्पॉटबील डक, राखी बगळा, उघड्या चोचीचा बगळला, जांभळा बगळा, स्पुनबिल रिव्हीर टर्न, प्रॉन्टिकोल, दलदल ससाणा आदी पक्षी दिसून येतात. तर बिबटे, तरस, रान मांजर, कोल्हे आदींसह सरपटणारे प्राणीही या ठिकाणी देखील पहावयास मिळतात, सध्या ढगाळ हवामानामुळे येथील पर्यटकांची संख्या कमी असून डिसेंबर पासून हे अभयारण्य पर्यटकांनी गजबजण्याची शक्यता आहे. पक्षांचे मोठ्या प्रमाणात आगमन झाल्याने फेब्रुवारीत पर्यटकांना येथे पक्षी निरीक्षणाचा आनंद घेता येणार आहे.

पर्यटकांना अभयारण्य बघण्यासाठी या ठिकाणी, पक्षी, प्राणी म्युझियम, दहा उंच मनोरे उभारण्यात आले असून, पर्यटकांना पक्षी आणि प्राण्यांची माहिती व्हावी यासाठी गाईड्स, दूर दृश्य बघण्यासाठी याठिकाणी टेलिस्कोप, दुर्बिण या सारख्या साधनांसह विश्रामगृह, गार्डन्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Social Media