12 देशांतून आलेल्या प्रवाशांना 7 दिवस क्वारंटाईन करणे बंधनकारक

जालना, दि 29:आफ्रिकेतून आलेल्या डोंबिवलीतील व्यक्तीची तब्बेत आज चांगली असून या व्यक्तीचां अहवाल पॉझिटीव्ह आलेला आहे. त्यांच्यामधील जिनोमिक सिकवेंसीग साठीचा स्वाब देण्यात आला असून त्यावर लक्ष ठेवल्या जात असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ओमीक्रोन संदर्भात चर्चा झाली असून 12 देशातून आलेल्या नागरिकांना 48 तास आधीचा RTPCR चाचणी अहवाल निगेटीव्ह असणं बंधनकारक असणार आहे.शिवाय दोन डोस घेणं बंधनकारक राहणार असल्याचं टोपे यांनी म्हटलं आहे.12 रीस्की देशातून आलेल्या नागरिकांना 7 दिवस कवारंटाईन राहणं बंधन कारक राहणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय ते जालन्यात बोलत होते.

आंतरराष्ट्रीय विमानतळावर या देशांतून येणाऱ्या विमानांना बंदी घालावी याबाबतचा निर्णय राज्याने घ्यावा याबाबत देखील मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा झाल्याच टोपे म्हणाले.या 12 देशा व्यतिरीक्त ईतर देशातून आलेल्या नागरिकांना RTPCR चाचणी बंधंकारक करायच्या का याबाबत अभ्यास करून निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले. शहरात पूर्वी बंद असलेल्या 1 ली 7 वी आणि ग्रामीण भागात 1 ली ते 4 थी पर्यंतच्या अटी शर्थीच्या अधीन राहून शाळा सुरु राहतील असंही ते म्हणाले.

Social Media