राज्यांतर्गत विमान करणाऱ्या प्रवाशांना RTPCR चाचणी बंधनकारक नाही

जालना : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशातील ईतर राज्यातून महाराष्ट्रात विमानाने येणाऱ्या प्रवाशांना दोन डोस घेतलेले असताना RTPCR चाचणी बंधनकारक असणार नाही.परंतु रिस्की देशांतून आलेल्यांना RTPCR चाचणी बंधनकारक असणार असून ७ दिवस क्वारंटाईन राहणं बंधंनकारक राहील असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटल आहे.

ते जालन्यात बोलत होते.राज्यात पहिल्या डोसच 82 टक्के लसीकरण झालं असून दुसऱ्या डोसच 44 टक्के लसीकरण झालं आहे. साडेसात कोटी लोकांना पहिला डोस दिला असून साडेचार कोटी लोकांना दुसरा डोस दिला आहे.राज्यात लसीकरण वेगाने सुरु असून उदिष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत लसीकरण सुरूच राहील असंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.सद्या राज्यात लॉकडाऊन लावण्यासारख कोणतंही कारण नाही,त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लावला जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं.

According to the directions of the Central Government, it will not be mandatory to test RTPCR passengers arriving in Maharashtra from other states of the country when they have taken two doses. But the test will be mandatory for those coming from risky countries to RTPCR and it will be mandatory to stay quarantined for 7 days, state health minister Rajesh Tope said.

Social Media