जालना : बूस्टर डोस व लहान बालकांच्या लसीकरणासाठी केंद्राकडे मागणी केलीय,केंद्र शासन जो काही निर्णय घेईल त्याची महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्यात येईल. लसीकरण नाही तर टॅक्सीतून प्रवास करता येणार नाही असा कुठलाच आदेश राज्यसरकार ने काढला नाही.आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Rajesh Tope)यांची माहिती.
धोकादायक असलेल्या 11 देशातून आलेल्या विमान प्रवाशांसाठी आल्या बरोबर RTPCR चाचणी बंधनकारक असून 7 दिवस कवारंटाईन करणे बंधनकारक आहे आहे.त्यांनतर 7 दिवस होम कवारंटाईन बंधनकारक असून 8 व्या दिवशी पुन्हा RTPCR बंधनकारक आहे असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलआहे.रिस्कि 11 देश वगळून ईतर देशातून आलेल्या प्रवाशांसाठी हा नियम नसून फक्त RTPCR चाचणी केली जाईल असं सांगताना आरोग्यमंत्र्यांनी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील आदेशात वेगळेपण राहणार नाही असंही स्पष्ट केलं.
राज्य सरकारने केंद्राकडे बूस्टर डोस आणि लहान मुलांच्या लसीकरणासाठी आग्रह धरला आहे, अत्यावश्यक सेवेतील लोक,आरोग्य विभागातील कर्मचारी यांना बूस्टर डोस देण्यात यावा अशी मागणी केंद्राकडे केली असून सिरमनं सुद्धा DCGI कडे अशी मागणी केली आहे.केंद्राचा हा अधिकार असून राज्य सरकार त्यांनी घेतलेल्या निर्णयाची अमलबजावणी करणार असल्याचं ही आरोग्यमंत्री म्हणाले.
लसीकरण नाही तर टॅक्सीतुन प्रवास करता येणार नाही असा कोणताही आदेश राज्य सरकारने काढलेला नाही.कायद्याला धरून नसलेले आदेश राज्य सरकार काढत नाही.मात्र लसीकरण करून घेणे ही आपली जबाबदारी असून लोकांना समजावून सांगून लसीकरण केलं जातं असल्याचे टोपे म्हणाले.
The Centre has demanded the Centre for vaccination of booster doses and children. Whatever decision the Central Government takes will be implemented in Maharashtra. The state government did not issue any order that it could not travel in a taxi if not vaccinated. Health Minister Rajesh Tope said.