हेलिकॉप्टर दुर्घटना ब्लॅक बॉक्स सापडला, जनरल रावत यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार

नवी दिल्ली दि 9 : तामिळनाडूतील निलगिरी जिल्ह्यात दुर्घटनाग्रस्त झालेल्या लष्करी हेलिकॉप्टर चा ब्लॅक बॉक्स सापडला असून या अपघाताची सखोल चौकशी सुरू झाली आहे , दरम्यान आज सायंकाळी उशिरा सीडीएस जनरल रावत यांच्यासह अन्य सैनिकांचे मृतदेह दिल्लीत आणण्यात येत आहेत, उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

काल दुपारी हेलिकॉप्टर अपघात होऊन जनरल बिपिन रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला, अपघातात जखमी अवस्थेत सापडलेल्या ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्यावर अद्याप उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असली तरी स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज संसदेच्या दोन्ही सभागृहात या अपघाताची विस्तृत माहिती देत त्रिस्तरीय चौकशी सुरू करण्यात आल्याचे स्पष्ट केले, यानंतर दोन्ही सभागृहातील सदस्यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांना आदरांजली वाहिली.

अपघात घडलेल्या ठिकाणाच्या 1 किमी परिसराची नाकेबंदी करून त्याची कसून तपासणी करण्यात येत आहे, हवाईदल प्रमुखांनी प्रत्यक्ष भेट देऊन अपघातग्रस्त ठिकाणाची आज पाहणी केली. एअर मार्शल मानवेंद्रसिंग यांच्या नेतृत्वाखालील एक विशेष दल या अपघाताची चौकशी करणार असून ते घटनास्थळी दाखल झाले आहेत.

संध्याकाळी दिल्लीच्या पालम तांत्रिक विमानतळावर अपघातातील सर्व मृतदेह आणण्यात येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह , राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे स्वतः तिथे उपस्थित राहून सीडीएस जनरल रावत यांच्यासह सर्वांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत . मृतदेह ओळखण्यासाठी नातेवाईकांना तिथे नेण्यात येणार असून गरज असेल तर डीएनए चाचणी ही करण्यात येणार आहे.

A black box of a military helicopter crashed in Nilgiri district of Tamil Nadu has been found and a thorough investigation has been launched into the accident, meanwhile, the bodies of CDS General Rawat and other soldiers are being brought to Delhi late this evening and will be cremated tomorrow.

Social Media