मोक्षदा एकादशीनिमित्त विठोबास फुलांची आरास, तर हिवाळ्यामुळे विठोबाच्या मूर्तीस कानपट्टी

पंढरपूर दि 14 :  मार्गशीर्ष मोक्षदा एकादशी निमित्त पंढरपूरच्या मंदिरात 600 किलो फुलांपासून विठ्ठल रुक्मिणीच्या गर्भगृहास आकर्षक फुलांची आरास करण्यात आली यासाठी झेंडू ,शेवंती ,निशिगंध, तुळस यांचा वापर करण्यात आला.

एकादशीच्या निमित्ताने नानासाहेब पांचुदकर या भक्ताने ही आरास विठ्ठल चरणी अर्पण केली. सध्या हिवाळा सुरू आहे. सर्वत्र थंडी वाढत आहे. अशातच परंपरेप्रमाणे विठ्ठलाच्या मूर्तीस उपरणेची कानपट्टी तसेच अंगावर रेशमी शाल पांघरण्यात आली आहे. जेणेकरून विठोबाचेही थंडीपासून संरक्षण व्हावे अशी यामागील परंपरेप्रमाणे धारणा आहे. विठोबाच्या अंगावर शाल आणि डोक्यावर कानपट्टी असल्याने विठोबाचे रूप अत्यंत गोजिरवाणे दिसत आहे.

Social Media