अहमदनगर मध्ये सैन्याचे शस्त्र प्रदर्शन

अहमदनगर : संरक्षण दलातर्फे वापरण्यात येणाऱ्या साहित्याची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी देशभरात ठिकठिकाणी भारतीय लष्कराकडून संरक्षण साहित्‍य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून संरक्षण मंत्रालयाच्या वाहन गुणवत्ता आश्‍वासन नियंत्रणालय अहमदनगर यांच्यातर्फे आज अहमदनगर येथील औरंगाबाद रोडवरील वाहन गुणवत्ता नियंत्रणालय परिसरात संरक्षण साहित्‍य प्रदर्शनाचे आयेाजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन आजपासून तीन दिवस सुरू राहणार आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी ब्रिगेडियर बी. के. पोखरियाल, अहमदनगर व्हीआरडीईचे जी. आर. एम. राव यांनी संरक्षण दलाच्या अत्याधुनिक यंत्रणेची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी महापालिका आयुक्त शंकर गोरे, उपमहापौर गणेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे संरक्षण साहित्य, रणगाडे, लढाऊ लष्करी वाहने, दहशतवादी हल्यावेळी वारण्यात येणारी अत्याधुनिक यंत्रणेनी सज्ज वाहने, युध्दामध्ये वापरण्यात येणारे आणि कमी वेळेत अंथरता येतील असे पूल, न्युक्लीयर तसेच जैवरासायनीक अस्त्रांपासून सुरक्षित असणाऱ्या लष्करी साहित्यांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रदर्शनाला जिल्‍ह्यातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, मान्यवर व्यक्ती भेट देत असून हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. विद्यार्थी आणि नागरिकांनी रणगाडे तसेच लष्कराच्या विविध प्रकारच्या वाहनांवर जाऊन छायाचित्रे काढली. तसेच अत्याधुनिक मशिनरी, औजारे आणि पोषखांची माहिती घेतली. या प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आस्‍थापना उप नियंत्रक कर्नल पुरव कौशल यांनी केले आहे.

Defense Literature Exhibitions are being organized by the Indian Army across the country to sensitize the citizens about the material used by the Defence Force. As part of the drive, a defense literature exhibition has been organized by The Ministry of Defence’s Vehicle Quality Safety Control Agency Ahmednagar today at the Vehicle Quality Control Area on Aurangabad Road in Ahmednagar. The exhibition will continue for three days from today.

Social Media