मुंबई : 2012 साली प्रदर्शित झालेल्या बॉलीवूडमधील खिलाडी अक्षय कुमारच्या ‘राउडी राठौर’ या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर आता या चित्रपटाच्या सिक्वेलवर काम सुरू आहे. याच चित्रपटाच्या सह-निर्मात्या शबिना खान यांनी 2019 मध्ये राउडी राठौर 2 ची घोषणा केली. आता प्रसिद्ध लेखक केव्ही विजयेंद्र प्रसाद हे चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांच्या सांगण्यावरून राऊडी राठौरच्या सिक्वेलच्या स्क्रिप्टवर काम करत आहेत.
‘राउडी राठौर 2 ची स्क्रिप्ट मी लिहित आहे’
मिड डे या न्यूज वेबसाईटच्या वृत्तानुसार, केव्ही विजयेंद्र प्रसाद म्हणाले की, मी सध्या राऊडी राठौर 2 ची स्क्रिप्ट लिहित आहे. कारण भन्साळी साहेबांनी सिक्वेल लिहिण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला होता. मी लवकरच ही स्क्रिप्ट पूर्ण करणार आहे. तसेच तो म्हणाला की मला या चित्रपटाच्या दिग्दर्शकाबद्दल काही माहिती नाही.
2022 च्या अखेरीस हा चित्रपट फ्लोरवर येऊ शकतो.
याच रिपोर्टमध्ये सूत्राच्या हवाल्याने असा दावा करण्यात आला आहे की, सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा पारोच्या भूमिकेत दिसणार आहे. तसंच या चित्रपटातील शिवा आणि पारोची मुख्य भूमिका सिक्वेलमध्ये दिसण्याची शक्यता आहे. या सिक्वलची कथा पूर्णपणे नवीन असेल. लवकरच चित्रपटाची स्क्रिप्ट पूर्ण होईल. पुढील वर्षी 2022 च्या अखेरीस हा चित्रपट फ्लोरवर जाण्याची शक्यता आहे.
सोनाक्षी आणि अक्षयची केमिस्ट्री
प्रभुदेवा दिग्दर्शित राऊडी राठौर हा चित्रपट विक्रमार्कुडू या हिट तेलुगू चित्रपटाचा रिमेक आहे, ज्याची पटकथा केवी विजयेंद्र यांनी लिहिली होती. 2012 च्या चित्रपटात अक्षय कुमारने डबल शिवा आणि IPS विक्रम सिंह राठौरची भूमिका साकारली होती. अॅक्शन आणि रोमान्सने भरलेल्या या चित्रपटात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानेही मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री चांगलीच पसंतीस उतरली होती.
After the unprecedented success of Bollywood player Akshay Kumar’s ‘Rowdy Rathore’ which was released in 2012, work is now underway on the sequel of the film. Shabina Khan, co-producer of the same film, announced Rowdy Rathore 2 in 2019. Now famous writer KV Vijayendra Prasad is working on the script of The Sequel of Rowdy Rathore at the behest of filmmaker Sanjay Leela Bhansali.