नागपूरसह विदर्भात पाऊस सुरु, पिकांचे मोठे नुकसान….

नागपूर : नागपूरसह संपुर्ण विदर्भात येत्या 5,6 दिवस ढगाळ वतावरणासह सर्वत्र तुरळक पावसाची शक्यता नागपूरचा प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली होती त्यानुसार आज नागपूरात सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे.

सर्वत्र पाऊस पडत असून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे . वातावरणात अचानक पूर्वीपेक्षा जास्त गारठा निर्माण झाला असून नागरिकांना ऐन हिवाळ्यात छत्र्यांचा आधार घ्यावा लागत आहे . नागपूर शहरात जोरदार पाऊस झाला असून पावसामुळे सामान्य नागरिकांची चांगलीच तारांबळ उडालेली आहे. या अवकाळी पावसाचा फटका कापूस, तूर , सह अन्य कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.

वर्धा जिल्ह्यातही आज सकाळपासून ढगाळ वातावरण पाहवयांस मिळत होते. सकाळपासून पासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात वातावरणात गारवा निर्माण झाला होता. दुपारदरम्यान जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या. अचानक बरसलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती.पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान मोठं नुकसान झाले आहे.

गडचिरोलीतही मुसळधार पाऊस येत असून वेधशाळेने 10 आणि 11 तारीखेला मेघ गर्जनेसह पाऊस येण्याचा अंदाज व्यक्त केला होता आणि तो अचूक ठरला आहे. सकाळ पासून सूर्यदर्शन झाले नसून अवकाळी पावसामुळे गारवा निर्माण झाला असल्याने रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्याची संख्या अल्प प्रमाणात दिसून येत आहे, सध्या शेतकऱ्यांचे खरीप पिक बहरलेले असतांना अवकाळी पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे .

It is raining everywhere and cloudy weather has been created. Suddenly there is a colder atmosphere than ever before and citizens have to resort to umbrellas in the winter. Nagpur city has received heavy rainfall and the rains have caused a lot of panic among the common citizens. Cotton, tur, and other pulses farmers have been affected by these untimely rains.

Social Media