नागपूर : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योति चा माध्यमातून OBC समाजाचा शेतकऱ्यांची प्रगती साधली जाणार आहे . त्यासाठी प्रयत्न केले जात असून विदर्भातील 7 जिल्ह्यात करडई या तेलबिया पिकांचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यास सुरुवात झाल्याची माहिती OBC बहुजन कल्याण मंत्री विजय वड्डेटीवार यांनी नागपूरात दिली .
विदर्भातील 7 जिल्ह्यात एकूण 16 हजार एकरवर करडई तेलबियांच्या प्रकल्पातून आरोग्यवर्धक तेलाचा ब्रॅंड तयार केला जाणार असून त्यातून शेतकऱ्याला रब्बी हंगामाकरिता हमखास उत्पन्नाची सोय नेहमीकरिता होणार असल्याचे मंत्री विजय वड्डेटीवार यांनी सांगितले.
करडई तेलबिया प्रकल्पाअंतर्गत विदर्भातील 7 जिल्ह्यातील 6 हजार 949 शेतकऱ्यांना 6 हजार 464 हेक्टर म्हणजेच 16 हजार 162 एकर क्षेत्राकरिता प्रति एकर 4 किलो प्रमाणे एकूण 646.60 क्विंटल बियाणे शेतकऱ्यांना महाज्योतितर्फे मोफत वाटण्यात आल्याचेही वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.
या करडई तेलबिया शेतकऱ्यांकडून प्रति एकर 5 हजार 400 रुपये प्रमाणे खरेदी सुद्धा करण्यात येणार असून महाज्योति ला मिळणाऱ्या नफ्यातूनही अंतिम नफ्याचे वाटप शेतकऱ्यांना केले जाणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले . या प्रकल्पातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढनार असून शेतकरी गटाला रोजगारही प्राप्त होणार आहे.
The progress of farmers of OBC society will be achieved through Mahatma Jyotiba Phule Research and Training Institute i.e. Mahajyoti. Efforts are being made for this and in 7 districts of Vidarbha the pilot project of kardai oilseed crops has started being implemented OBC Bahujan Kalyan Minister Vijay Waddetiwar informed in Nagpur.