नागपूर : ST कर्मचाऱ्यांचा संपामुळे प्रवाशांची गैरसोय टाळावी यासाठी आज पासून ST महामंडळाच्या नागपूर विभागातर्फे तब्बल 70 ते 80 बस गाड्यांनी अमरावती, चंद्रपूर, वर्धा, भंडारा मार्गावर नॉनस्टॉप बस सेवेला सुरुवात करण्यात आली आहे.
आज पासून नागपूर विभागात दररोज 130 बस फेऱ्याने वाहतूक सुरू करण्यात आल्याने प्रवाशांना त्यांच्या हक्काच्या ST बस मधून प्रवास करायला मिळत आहे . नागपूर विभागातून फिक्स पॉईंट वरून दर अर्धा तास, एक तासांनी नॉनस्टॉप बस गाड्या सोडण्यात येत आहेत. ST च्या या नॉनस्टॉप सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून सर्व बसेस प्रवाशांनी भरून जात आहे . तर दुसरीकडे कर्मचारी कामावर रुजू होण्याचे प्रमाण वाढले असून सध्या नागपुर विभागात 110 पर्यवेक्षकासह चालक-वाहक कामावर हजर झाले आहे.
तर खाजगी एजन्सी कडूनही 22 चालक अतिरिक्त प्राप्त झाल्याने नियमित बस गाड्या सोडण्यास काही प्रमाणात का होईना नागपुर आगार प्रशासनाला यश येत असल्याचे दिसत आहे .