चिखलदरा ‘स्काय वॉक’ला केंद्राची परवानगी

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील पर्यटन स्थळ असलेल्या चिखलदरा येथील स्कायवॉकचे काम लवकरच पूर्णत्वास जाण्याची चिन्हे आहेत. स्कायवॉक विकासाला काल केंद्र शासनाने परवानगी दिली असल्याची माहिती पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व आणि पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्यात नुकतीच याबाबत बैठक होऊन केंद्र शासनाकडून परवानगी मिळण्यासाठी राज्य शासनाने पाठपुराव्याची मागणी पालकमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार तत्काळ पाठपुरावा होऊन परवानगी प्राप्त झाली आहे. स्कायवॉक विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

विदर्भाचे नंदनवन असलेल्या मेळघाटातील चिखलदरा येथे स्कायवॉकचे काम पूर्ण होण्यास आता गती मिळेल. जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. स्कायवॉक पर्यटकांसाठी एक महत्वाचे आकर्षण केंद्र ठरणार असून, पर्यटकाचा ओघ वाढेल. स्थानिकांमध्ये रोजगारनिर्मिती वाढेल, असा विश्वास पालकमंत्री ऍड. ठाकूर यांनी व्यक्त केला.

Social Media