O Antava नंतर, सामंथा विजय देवरकोंडाच्या लाइगरमध्ये आणखी एक डान्स नंबर करणार?

मुंबई : दक्षिणेची राणी सामंथा (Queen Samantha of the South)रुथ प्रभू हिने तिच्या पहिल्या डान्स नंबर ‘ओ अंतावा’ मध्ये तिच्या सिझलिंग मूव्ह आणि डान्सिंग स्टाइलने सर्वांना वेड लावले आहे. अभिनेत्रीचे हे गाणे केवळ चाहत्यांमध्येच नाही तर बॉलिवूड सेलिब्रिटींमध्येही खूप लोकप्रिय आहे. नुकताच स्वरा भास्करने या गाण्यावरचा तिचा व्हिडिओ शेअर केला आहे.हे गाणे सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. हे गाणे देवी श्री प्रसाद आणि इंद्रावती चौहान यांनी संगीतबद्ध केले आहे. रिपोर्टनुसार, सॅम विजय देवरकोंडा यांच्या ‘लाइगर'(lyger) चित्रपटाच्या निर्मात्यांशी डान्स नंबरबाबत चर्चा करत आहे. अशा परिस्थितीत सामंथा आणखी एका डान्स नंबरमध्ये दिसणार की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. चाहत्यांना  खूप आशा आहेत.

अल्लू अर्जुनने(Allu Arjun) समंथाला(samantha) ‘ओ अंतवा’ गाण्यासाठी राजी केले. अभिनेत्री सुरुवातीला गाण्याबद्दल संकोच करत होती. पण तिने नंतर होकार दिला. IWMBUZZ च्या रिपोर्टनुसार, तीन मिनिटांच्या गाण्यासाठी समंथाने 5 कोटी रुपये घेतले. काही काळापूर्वी अभिनेत्रीने या गाण्याचा BTS व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती या गाण्यासाठी खूप मेहनत करताना दिसत होती.

समंथाने नागा चैतन्यपासून वेगळे होणारी पोस्ट केली डिलीट

अलीकडेच समांथाने(samantha) तिचा पती नागा चैतन्यपासून(Naga) विभक्त होणारी पोस्ट देखील हटवली आहे कारण आता या पोस्टमुळे तिला काही फरक पडत नाही. 2021 मध्ये, 2 ऑक्टोबर रोजी, सामांथाने नागा चैतन्यपासून वेगळे होण्याचे अधिकृत विधान जारी केले. नागा चैतन्यपासून विभक्त झाल्यापासून अभिनेत्री सतत चित्रपट साइन करत आहे. अभिनेत्री तिच्या करिअरच्या शिखरावर धोकादायक भूमिका साकारत आहे.

या चित्रपटांमध्ये सामंथा दिसणार आहे

रिपोर्ट्सनुसार, सामंथाने(samantha) हॉलिवूडचा एक प्रोजेक्टही साइन केला आहे ज्यामध्ये ती बायसेक्शुअलची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘अॅरेंजमेंट ऑफ लव्ह’ असे या चित्रपटाचे शीर्षक असून ते भारतीय लेखक टिमरी एन मुरारी यांनी लिहिले आहे. सामंथाने ‘द फॅमिली मॅन 2’ मध्ये तिच्या जबरदस्त अभिनयाने सर्वांना आश्चर्यचकित केले. याशिवाय तिचे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. दिग्दर्शक विघ्नेश शिवनचा काथुवाकुला रेंडू कादल आहे ज्यामध्ये ती विजय सेतुपती आणि नयनतारा यांच्यासोबत मुख्य भूमिकेत आहे.

Social Media