मी जैराम बावणे एक आपलाच लहान भाऊ, आपलाच लेक.
या आजच्या गणतंत्र दिनानिमित्त 2 शब्द बोलू इच्छितो.
माझे पापा पोलिस खात्यात कार्यरत होते 2008 ला भंडारा पोलिस मुख्यालयातून ASI म्हणून रिटायर्ड झाले,,त्यांना आपल्या खाकीवर स्वत:च्या जीवापेक्षा,,आपल्या परिवारा पेक्षाही जास्त प्रेम होता खाकी वर्दितला देव माणूस कर्तव्यनिष्ट प्रामाणिक अशी त्यांची ओळख पोलिस बँड मेजर ASI श्रीराम बिसनजी बावणे,,,भंडारा पोलीस बैंड चा आख्या महाराष्ट्रात नावजलेला भीष्म पितामह ज्या व्यक्तिने भंडारा पोलीस बैंड करीता आपले जीवन सर्वस्व अर्पण केले आख्या महाराष्ट्रात भंडारा पोलिस बैंड चे नाव मोठे केले,,
प्रत्येक वर्षी प्रमाणे याही वर्षाला गणतंत्र दिवस आला 26 जानेवारीनंतर 15 ऑगस्ट दिवस येईल व आपल्यात अचानक देशप्रेम जागृत होईल. पण मला असं वाटते, आपला हा देशा विषयी प्रेम, तिरंग्या विषयी प्रेम हा24 तास 365दिवस मनामध्ये राहावे, कारण 24 तास 365 दिवस कुणी आहेत जे फक्त व फक्त आपल्यासाठी जगत आहेत, लढत आहेत, यासाठी आपण काय करावं? यासाठी आपल्या अंत:करणातून पाहावं त्या तिरंग्याला जो शान आहे आपली, इमान आहे आपला, तोच रुतबा आहे आपला, मग क्षणभर आठवण करावे त्या लढाईची ज्या लढाईत आपलाच भाऊ, आपलाच बाप – काका – मामा शहीद झाला, तो कुणासाठी व का शहीद झाला? काय गरज होती त्याला त्या मायभूमीच्या सरहद्दीत प्राण सोडायची? आपल्या घरचा दसरा, दिवाळी सोडून, रक्ताची होळी खेळायची काय गरज होती? त्याला 26/ 11 च्या हल्ल्यात रक्ताच्या थारोळ्यात पडायची काय गरज आहे हो त्या खाकी वाल्याला? आपला सुख दुःख त्यागून,आपल्या लेकराला पोरकं करायची काय गरज आहे हो त्याला? आपल्या मायबापाची सेवा सोडून, समाजाची, शासनाची, माझी, तुमची रक्षा करायची काय गरज आहे हो? त्याला भारताच्या सरहद्दीवर दिवस रात्र एकटक लावून करडी नजर ठेवायची, काय गरज आहे त्याला उन्हा-तान्हात, थंडीत पावसात, बर्फात, पावसात, पुरात, आगीत उडी घेऊन लोकांचे जीव वाचविण्याची, स्वतःच्या जीवाची स्वतःच्या परिवारातील लोकांची काळजी सोडून, आपली काळजी करायची, काय गरज होती त्या तुकाराम ओंबळे ला आपली छाती छननी करायची, क्षणभर शांत मनाने विचार करा, विचार करा भावांनो विचार करा. आज मी जर दोन शब्द मोबाईल द्वारे लिहीत आहो, ते त्याच खाकी वर्दी वाल्यांमुळे, हा माझा मॅसेज तुम्ही वाचू शकत आहात.
त्याच खाकी मुळे, वो दिनरात जगता है, इसिलीये हम आराम से सो सकते है | हमारी मॉं हमे ९ महिने पेट मे रखकर बोहोत तकलीफ सहकर हमे जन्म देती है, और हमारी रक्षा करती है| हमे पालपोसकर बडा करती है, मगर अपने वही मॉं बहन और हमारी रक्षा,वहा एक फौजी उम्रभर सरहद पर हम सबकी रक्षा करता है| सोचने वाली बात है और हमे साल मे एक दिन याद आती है,,भारत माता की, तिरंगे की, मजहब नाही सिखाता आपसे मे बैर करना,, हिंदू है हम, हिंदू है हम, हिंदुस्तान हमारा, सारे जहाँसे अच्छा हिंदुस्तान हमारा,
भावांनो, आपली ना कोणती जात आहे, ना कोणताही धर्म, बस आपण हिंदुस्तानी आहोत, हीच आपली जात आहे व हाच आपला धर्म आहे. आपला धर्म आहे माणुसकीचा. त्याला जपणे हेच आपले चांगले कर्म. राजनीतिक लोक आपल्या स्वार्थासाठी आम्हा दोघे भावात झगडे लावून, दोन्ही बाजूने वळतात व स्वतः सुरक्षित राहतात. पुन्हा एक प्रत्येक वर्दी वाला हा लाच घेणारा नसतो भावांनो. काही लोक आहेत जे पैश्या समोर आपली खाकी, आपला स्वाभिमान, आपला जमीर विकतात. त्या एकामुळे सर्वांवर डाग लागतो. पण सर्वच तसे गद्दार नसतात. म्हणण्याचा तात्पर्य हाच,RESPECT ALL KHAKIS MAN, RESPECT ALL INDIANS FORCE’S
तो सरहद्दी वरचा फौजी असो वा आपल्या गावातला पोलिस. वो है तो सब है| वो नही तो सब खतम है| इज्जत करा भावांनो त्यांची.
ये मेरे वतन के लोगो, तुम खूब लगालो नारा, ये शुभ दिन है हम सबका,लहराता तिरंगा प्यारा|
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
काही चुकलं असेल तर आपलं समजून माफ करा कुणाला हसायला सुद्धा येईल माझा msg वाचून याला केव्हापासून येव्हडी देशभक्ती जागृत झाली, तर भावा मी सरहद्दीवर राहून तर सेवा नाही देऊ शकलो, म्हणून मनात थोडासा विचार आला, तो आपल्या समोर msg द्वारे ठेऊन,1 percent का होईना देशभक्ती करण्याचा प्रयत्न करतो.
जैराम बावणे
पोलीस बॉईज अससोसिएशन, भंडारा जिल्हा अध्यक्ष……..जय हिंद