कोल्हापूर : महाद्वार, गरुड मंडप, कासव चौक, पितळी उंबरा, गाभारा असा प्रवास करत मावळतीच्या
सुवर्ण किरणांनी अखेर रविवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीवर पूर्णपणे प्रकाशझोत टाकला. सूर्यकिरणं देवीच्या मुखापर्यंत पोहोचली.
पाच दिवसांच्या उत्तरायण किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशीपेक्षा तिप्पट तीव्रता दुसऱ्या दिवशी होती.
चांदीच्या उंबऱ्यापर्यंतची तीव्रता १० वर्षांत प्रथमच १६ हजार ६०० लक्ष इतकी नोंद झाली आहे. शिवाय, स्वच्छ वातावरण,कमी आर्द्रता आणि धूलिकण नसल्यानं पूर्ण क्षमतेनं किरणोत्सव झाला.
मंदिर स्थापत्याच्या वैशिष्ट्यामुळे झालेला किरणोत्सवाचा हा अनुपम सोहळा पाहून पर्यटक भारावून गेले. पूर्ण क्षमतेनं किरणोत्सव होताच ‘अंबा माता की जय’ अशा जयघोषात आरती करण्यात आली. करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात वर्षातून दोनवेळा किरणोत्सव होतो.
Travelling to Mahadwar, Garuda Mandap, Kasav Chowk, Brass Umbra, Gabhara
The golden rays finally put the spotlight completely on the idol of Karveernivasini Sri Ambabai Devi on Sunday. The sun rays reached the mouth of the goddess.