शरद पवार यांची सातव्याच दिवशी कोरोनावर यशस्वीपणे मात

मुंबई : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सातव्याच दिवशी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. त्यानीच व्टिट करत कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती दिली आहे.

सिल्व्हरओक येथे होम आयसोलेट

त्यानी व्टिट मध्ये म्हटले आहे की, माझी पुन्हा  एकदा कोरोना चाचणी करण्यात आली त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. माजी तब्येतही आता बरी आहे दरम्यानच्या काळात माझ्या तब्येतीची काळजी करणा-या आणि घेणा-या सहका-यांचे आभर मानतो असेही त्यानी व्टिट मध्ये म्हटले आहे. मागील सोमवारीच (दि २४ जाने) पवार यानी सिल्व्हरओक येथे होम आयसोलेट होत असल्याचे सांगत उपचार घेत असल्याचे व्टिट केले होते. त्यानंतर आत्यांचे सात दिवसांचे सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आले होते डॉक्टरांच्या सल्लयाने आता लवकरच ते पुन्हा घराबाहेर पडणार आहेत.

Social Media